Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापन भाग-2

 Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan नमस्कार शेतकरी मित्रहो मागील भागात आपण मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापण भाग १ यामध्ये बऱ्याच गोष्टी जाणून...

 Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan नमस्कार शेतकरी मित्रहो मागील भागात आपण मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापण भाग १ यामध्ये बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या होत्या आता आपण मिरचीच्या जाती,  रोप लागवड खत व्यवस्थापन, इत्यादी बद्दल जाणून घेऊ.

मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापन  भाग-2

मिरची लागवड करत असताना मिरचीच्या जाती कुठल्या कुठल्या निवडल्या गेल्या पाहिजे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर मी आज तुम्हाला काही वेगवेगळ्या जाती शिफारस करणार हे, तर तुम्ही या पद्धतीने जातीची निवड करू शकता.

मिरचीच्या जाती
Mirchi_lagwad 

या जाती रसशोष करणाऱ्या किडीसाठी टॉलरन्स आहेत, त्या  काही जाती आपण शेतकऱ्यांना  शिफारस करणार आहोत. 

यामध्ये मी तीन भाग केलेले आहेत त्यात पहिला भाग दिलेला आहे पोपटी जात कमी तिखट गर्द हिरवी, जास्त तिखट आणि फक्त लाल विक्रीसाठी विकल्या जाणारी मिरची. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या जातीची निवड केली जाते. तसेच विदर्भामध्ये फक्त पोपटी जातीला जास्त महत्त्व आहे मराठवाड्यात काळ्या हिरव्या गर्द तिखट मिरचीला जास्त महत्त्व आहे तर मी तुम्हाला अशा जाती देतो, त्यानुसार तुम्ही त्या जातीची निवड करू शकता.

तर पोपटी मिरची कमी तिखट असणारे मिरचीमध्ये जर सांगायचं जर झालं तुम्हाला तर राशी कंपनीची सोनल आहे, अंकुर कंपनीची ९३० आहे, नांगवु सीड ची एन डब्ल्यू ७७११ आहे, त्यानंतर ज्वेलरी आहे. आणि नामदेव उमाजीची ओमेगा आहे, सिमीन्स सीड ची सितारा गोल्ड आहे,ऍडव्हान्टा सीड ची सुपर महाज्वाला आहे, ह्या झाल्या पोपटी कमी तिखट असलेल्या मिरचीच्या जाती.

तसेच गर्द हिरवी आणि तिखट असणाऱ्या मिरची मध्ये जर सांगायचं जर झालं तुम्हाला तर ऍडव्हान्टा कंपनीची एके-४७ जात आहे, तसेच मायको ची तेजाआहे,राशीची प्राइड आहे,  त्यानंतर नेत्राची आणि अनुष्का हे सुद्धा जात आहे .मायको ची नवतेज आहे, जे की ची ईश्वरी आहे, सेमीन सिजेंटाची ५५ ३१ जात आहे. बायेर ची  लेझर आहे पंचगंगाची बिजली आणि ६५१ ही एक जात आहे, आणि कलश सीडची अलबेली KSP-१४८३ ही एक जात आहे ह्या  झाल्या गर्द जास्त तिखट असणाऱ्या  मिरचिच्या जाती.

तसेच लाल विक्रीसाठी नुसतं जर लालच करून जरआपल्याला विकायची असेल. आमच्या काही भागांमध्ये विदर्भामध्ये जर पाहिलं किंवा मराठवाड्यात जर  तुम्ही पाहिलं तर पांढरकवडा वनी, मालेगाव या भागांमध्ये फक्त लाल विक्रीसाठी आंध्रप्रदेश मधील काही शेतकरी तिथं येतात आणि फक्त लाल मिरची तयार करून ते विकतात बाजारांमध्ये तर लाल विक्रीच्या मिरचीसाठी सांगायचं जर झालं तुम्हाला तर  BASF ची आरमार जात आहे. सिजेंटाची१०४८ जात आहे.आणि लोकल त्या मार्केटला बाहुबली जात आहे, तर ह्या झाल्या लाल विक्रीसाठी असलेल्या जाती.

खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापनामध्ये जे आहे मुख्यत्व बरेचशे शेतकरी आता ठिबक (ड्रीप) आणि मल्चिंग वर लागवड करतात. तर मल्चिंग वर लागवड करत असताना, बेडवर लागवड करत असताना बेसल डोस जो आहे हा बेडमध्येच भरून द्यावा जेणेकरून मिरचीला तुम्हाला परत परत डोज देण्याचा काम पडणार नाही. 

नंतर जे आपल्याला द्यायचे आहेत ते सगळे विद्राव्य खतं द्यायचे आहेत तर बेसन डोज मध्ये कुठले खत दिलं गेलं पाहिजे, तर मिरचीला मुख्य  अन्न द्रव्याची पूर्तता करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग अधिक १०:२६:२६ च्या  २ बॅग किंवा दोन बॅग  डीएपी अधिक एक बॅग पोटॅश या रीतीने तुम्ही मुख्य अन्नद्रव्याची  पूर्तता करू शकता. 

तसेच सोबतच आपल्याला द्यायचे दुय्यम अन्नद्रव्य आणि सुष्म अन्नद्रव्य  कुठली दिली गेली पाहिजे, तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर  महाधन चे बेन्ससल्फ सल्फर दानेदार येथे ते घ्यायचं दहा किलो, सोबत मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो, तसेच रायझर जी आहे उत्तम गुणवत्तेचं हुमिक ऍसिड हे घ्यायचं, आपल्याला दहा किलो सोबत लिंबोळी पेंड हे घ्यायचे आपल्याला 200 किलो आणि जमिनीतील उपद्रवी किडींच्या नियंत्रणासाठी कारटॉप हायड्रोक्लोराइड हे घ्यायचं आपल्याला पाच किलो सुद्धा तुम्ही त्यात मध्ये वापरू शकता.तर हा संपूर्ण एकत्र मिश्रण करून या सगळ्या सुश्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य याचं सगळं तुम्ही मिश्रण करून हा बेसल डोज जो आहे हा बेडमध्ये भरून द्यावा. 

काही महत्वाच्या बाबी 

शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करत असताना, कुठल्या पद्धतीने आपण त्याची पूर्ण निगा करावी किंवा काळजी घ्यावी हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करतांना मल्चिंगचा जो पेपर आहे हा 25 ते 30 मायक्रॉनचा पेपर असावा.

आपल्याला जी ही मिरचीचे "mirchi " पिक आहे हे साधारणतः लागवडीपासून सहा ते नऊ महिन्यापर्यंत आपल्याला मिरची टिकवायची त्यामुळे मल्चिंग चा पेपर जो आहे हा आपल्याला त्याच्या मायक्रोन वर अवलंबून आहे. त्यामध्ये 25 ते 30 मायक्रोन जर मिळत असेल.  35 मायक्रोन जरी पेपर घेतला तरी अडचण नाही. तसेच लागवड करते वेळेस चांगलं पाणी देऊन म्हणजेच लागवड करते वेळेस बेड चांगला ओला करून वापसा स्थीती आल्यानंतर मिरचीची लागवड करावी.

लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्या दिवशी तुम्ही मिरची लागवड करता त्या दिवशी बेड पूर्ण ओला असतो, मिरची लागवड करतो. मिरची लागवड केल्यानंतर सतत त्याला पाणी देऊ नका. दुसऱ्या दिवशी पाणी दिले, तिसऱ्या दिवशी पाणी दिले,सतत जर पाणी दिलं तर रोप लवकर स्थिरावणार नाही. तर  लवकरात  लवकर ताण आल्यावर पाणी द्या म्हणजे आधी बेड पूर्णपणे ओला करा रोप लावा रोप लावल्यानंतर थोडासा ताण द्या आणि नंतर त्याला पाणी द्या. जेणेकरून आपलं रोप लवकर स्थिरावेल.तसेच शक्य झाल्यास रोपे लागवड करण्याच्या अगोदर रोपाची प्रक्रिया करून रोप लागवड करा.

तर मित्रहो या भागात आपण मिरचीच्या जाती आणि खत व्यवस्थापन या बाबत तसेच इतर बाबींकडे आपण लक्ष दिले, पुढील भागात आपण आळवणी, व फवारणी वेळापत्रक, असेच विद्राव्य खताचे शेडूल्ड समजुन घेऊ.

हा मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापन  भाग-2 'Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan' आहे.मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापन  भाग-१ वाचायला विसरू नका.

धन्यवाद...!




No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!