Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

कापूस लागवडीचे योग्य अंतर.

Kapus Lagwadiche Yogya Antar  नमस्कार आजचा आपला विषय आहे कापूस लागवडीचे योग्य अंतर. आता लागवडीच्या अंतराला का महत्व आहे? कापसाची कोणत्या अंत...

Kapus Lagwadiche Yogya Antar नमस्कार आजचा आपला विषय आहे कापूस लागवडीचे योग्य अंतर. आता लागवडीच्या अंतराला का महत्व आहे? कापसाची कोणत्या अंतरात लागवड केली पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे अंतर वेगळे राहू शकते,प्रत्येक शेतासाठी हे वेगळे अंतर राहू शकते. मग कोणत्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लावलं पाहिजे, लागवडीचे अंतरामध्ये काय महत्त्वाचं आहे? हे सगळे आपण आज पाहणार आहोत.

kapus_lagwad_yogya_antar


कापूस लागवडीचे योग्य अंतर Kapus Lagwadiche Yogya Antar


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकरी झाडांची संख्या. एकरी झाडाच्या संख्येवर उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे एकरी झाडांची संख्या आपण किती ठेवायला पाहिजे? त्यानंतर जर आपण एकरी झाडाची संख्या वाढवायला गेलो.तर  खूप जास्त  कापूस दाटेल आणि कापूस खूप जास्त दाटला, म्हणजे बोन्ड सड होईल, पातेगळ होईल, खालचे बोंड गळून जातील, फवारणी  करताना त्रास होईल, अंतर मशागत करता येणार नाही. 

तर या सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्य अंतर आपण कसं ठेवावं, आपण अंतर किती ठेवावं जेणेकरून योग्य झाडांची संख्या आपल्याला राखता येईल. म्हणजे उत्पादन सुद्धा आपलं चांगले येईल. आणि चुकीचे अंतरामुळे जे नुकसान होतं ते सुद्धा आपल्याला टाळता येईल.

एकरी झाडांची संख्या 


आता लागवडीच्या अंतराबद्दल जर बोलायचं झालं तर, एका एकरात किती झाडं बसतात तर हे गणित समजून घेणे आवश्यक आहे. ते असे,एक एकर म्हणजे ४३,५६० स्क्वेअर फूट. आता एकरी झाडांची संख्या कशी काढायची? तर कोणतेही अंतर असू द्या, तुमचा फळबाग असो, मिरची असो किंवा टोमॅटो असो कापूस असो किंवा कुठल्याही पिकामध्ये आपण येथे झाडाची संख्या कशी काढतो? 

तर दोन ओळीतलं अंतर गुणिले दोन झाडातले अंतर याचा गुणाकार करायचा. म्हणजे समजा आपण कापूस चार बाय दोन वर लावतो, दोन ओळीत अंतर चार फूट आहे दोन झाडात अंतर दोन फुट आहे, तर चार गुणिले दोन याचा गुणाकार किती येतो आठ. समजा चार बाय एक वर लावलं तर चार गुणिले एक याचा गुणाकार येतो चार, समजा तीन बाय तीन वर लावला तर 3*3 = 9 उत्तर येतं. तर ओळीतले अंतर गुणीला झाडातले अंतर याचा गुणाकार करून आणि एका एकराचे चौरस फुट ४३,५६० या आकड्याला त्या गुणाकारांने  भाग द्यायचा म्हणजे आपल्याला झाडांची संख्या काढता येते. आपण पुढील प्रमाणे उदाहरण पाहू.
          
        ओळीतले अंतर X झाडातले अंतर / ४३,५६० = एकरी झाडांची संख्या, तर आपण एकरी किती झाडे बसतील ते पाहू 
        🍀 ओळीतले अंतर ३ फूट झाडातले अंतर १  फूट      = ३x १=३ / ४३,५६०        =  १४५२०   झाडे 
        🍀 ओळीतले अंतर ३ फूट झाडातले अंतर १.५ फूट   =३x १.५=४.५ / ४३,५६०  =   ९८६८०  झाडे 
        🍀 ओळीतले अंतर ४ फूट झाडातले अंतर १             =४x १= ४ / ४३,५६०        =  १०,८९०  झाडे 
        🍀 ओळीतले अंतर ४ फूट झाडातले अंतर १.५          =४x १.५=६ / ४३,५६०     =    ७,२६० झाडे 
        🍀  ओळीतले अंतर ५ फूट झाडातले अंतर १            =५x १ =५ / ४३,५६०        =    ८,७१२ झाडे 

याप्रमाणे गणित करून आपण झाडांची संख्या काढू शकतो. झाडांच्या संख्येवरच आपले उत्पादन अवलंबून असते.अंतराचे महत्त्व काय मी तुम्हाला सांगितलं आहे. झाडांची संख्या योग्य ठेवणे.ज्यामुळे आपले उत्पादन वाढेल. 

झाडांची योग्य संख्या ठेवली नाही तर झाडांना हवा व सूर्यप्रकाश सुद्धा मिळणार नाही,झाडे एकदम दाट लावून दिले तर खालचे बोन्ड देखील सडतील, खालचे पाते जे आहेत ते गळून जातील, अशा अनेक गोष्टी होऊ  शकतात. झाडाची संख्या योग्य राखावी लागेल,त्यामुळे तिथे हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश सुद्धा मिळाला पाहिजे.

त्याच्यामुळे संख्या वाढवल्यामुळे इतर नुकसान काही व्हायला नको ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता कोणत्याच शेतकऱ्यांसाठी एकच अंतर ठरवणं हे योग्य नाही. आपल्याला अंतर कसं ठेवायचं? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या अंतर ठेवतांनी ठरवावं, तर शेतकऱ्यांनो मी तुम्हाला सांगेन कोणत्याच  तज्ञाचं ऐकू नका, आपणच आपले तज्ञ आहोत. आपण शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ आहोत. फक्त विचार शांततेत करायचा आणि हे तज्ञ बिज्ञ यांचं काही ऐकू नका. हे अंतर ठेवा, ते अंतर ठेवा..!  

आपण एवढ्या वर्षापासून शेती करतोय  तर आपल्या शेतात कापूस किती वाढतो ही गोष्ट आपल्याला माहित आहे. आपलं जमीन कशी आहे, सुपीक आहे का मध्यम आहे का हलकी आहे, ते आपल्याला माहित आहे. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का ते आपल्याला माहिती आहे.आपण जात कोणती लावतो तिची वाढ कशी होते ते सुद्धा आपल्याला माहिती असते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण योग्य अंतर किती ठेवावे हे प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतः ठरवावे मी सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही की हेच अंतर ठेवा. हेच अंतर तुमच्या शेतासाठी तुमच्या या जातीसाठी हेच अंतर योग्य असं मी सुद्धा सांगू शकत नाही.

कापूस लागवडीच्या पद्धती 


कापूस लागवडीच्या काही पद्धती आहेत. तर त्यात मी तुम्हाला चार पद्धती सांगतो. 

१) समान अंतर पद्धत 

या पद्धतीपैकी सगळ्यात पहिली म्हणजे समान अंतर पद्धत. जे बरेच वर्षापर्यंत समान अंतर पद्धत चालली. समान अंतर पद्धत म्हणजे दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं अंतर सारखं ठेवणे. आता याचे फायदे काय? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे समान अंतर पद्धतीमध्ये आपल्याला जी डवऱ्याचे फेर जे आपण मारतो. अंतर समान असल्याने आपण आडवी आणि उभी दोन्ही बाजूंना आंतर मशागत आपण करू शकतो. आणि आडवी उभी आंतर मशागत केल्यामुळे तण नियंत्रणावरचा खर्च हा खूप कमी होतो. बरेचसे तण फेरामध्ये निघून जाते. पण याला अडचण काय आहे.पहिला दोष म्हणजे जर यात कमी अंतर झालं, तर कापूस चारही बाजूने दाटतो. याच्यामध्ये आपण झाडांची संख्या वाढवू शकत नाही. आपल्याला जर उत्पादन वाढवायचे तर झाडाची संख्या थोडीशी वाढवावी लागेल. आपल्याला त्यामुळे समान अंतर मध्ये  झाडाची संख्या वाढू शकत नसल्यामुळे उत्पादन आपल्याला कमी होऊ शकत. 

२) विषम अंतर पद्धत 

या पद्धतीत दोन ओळींमध्ये अंतर हे जास्त असतं. कापूस दाटणार नाही कापसाची दाटणी होणार नाही एवढं अंतर लक्षात घ्या. मी जे प्रत्येक वाक्य सांगतोय कारण ही खूप शेतकऱ्यांची चूक होते. विषम अंतर पद्धतीमध्ये दोन ओळीतला अंतर एवढं ठेवा की त्यामध्ये कापूस दाटणार नाही.जर तुमचा तीन फुटात कापूस दाटत असेल, तर साडेतीन फूट ठेवा. चार फुटात दाटत असेल तर साडेचार फूट ठेवा, पाच फूट ठेवा, पाच फुटातहि दाटत असेल तर साडेपाच ठेवा, सहा फूट ठेवा.

 कमीत कमी तीन फूट जास्तीत जास्त सहा फूट. कशावर अवलंबून आहे ते जमीन ,पाणी, खत सगळं व्यवस्थापन याच्यावर तुमच्या शेतात कापूस किती वाढतो. ते हलक्याच हलकी जमीन असेल तर तीन फूट राहू शकते. हलक्यासारखी कोरडवाहू जमीन कमी सुपीक. थोडीशी सुपीक जमीन असेल, मध्यम जमीन असेल तर दोन ओळीत नंतर चार फूट ठेवा. सुपीक जमीन आहे बागायती सुद्धा आहे खत व्यवस्थापन सुद्धा चांगला आहे तर दोन ओळीत अंतर पाचफुट ठेवा. खूप चांगली जमीन आहे भरपूर खत देताय पाण्याची व्यवस्था आहे डेरा करणारी जात आहे तर अशा वेळेस मग सहा फूट सुद्धा तुम्ही अंतर ठेवू शकता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर अवलंबून तुम्हाला दोन ओळीतला अंतर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे दोन ओळीत अंतर जर तुमचं चुकलं फार कमी झालं तर, बोंड सण होईल. आणि फार जास्त झालं तर एकरी झाडाची संख्या तिथं कमी होईल. थोडासा जास्त झाला तर नक्की चालेल पण कमी अंतर इथं दोन ओळीत व्हायला नको. 

तर आज आपण कापसाच्या लागवडीचे योग्य अंतर "Kapus Lagwadiche Yogya Antar"जाणून घेतले.माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.
No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!