Bhendval Bhavisyavani 2023 Kay Aahe Andaj? नमस्कार शेतकरी मित्रांनो,बुलढाणा जिल्यातील भेंडवळ या गावी अक्षयतृतीयतेच्या दुसऱ्या दिवशी भेंडवळ भ...
bhendval_bhakit_2023 |
भेंडवळ भविष्यवाणी २०२३ काय आहे अंदाज?
रामचंद्र महाराजांपासून ही परंपरा आहे. आता रामचंद्र महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज ही परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.
प्रामुख्याने काय केले जाते की शेतामध्ये खड्डा घेतला जातो त्या खड्ड्यांमध्ये माठ ठेवल्या जातो. तो माठ आणि मग त्याच्या भोवताल अनेक प्रकारच्या धान्याच्या राशी ठेवल्या जातात. आणि मग त्यानुसार तो अंदाज वर्तवला जातो. तर यावर्षी चे भेंडवळ चे भाकीत आपण जाणून घेऊ.
भेंडवळ या गावी भाकीत वर्तवले दिसतं. भेंडवळ भविष्यवाणी म्हणून महाराष्ट्र आणि भारतभर ती प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी त्या ठिकाणच्या भाकितावर लक्ष ठेवून असतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्या ठिकाणी जाऊन ते पूर्ण बातम्या कवर करत असतो.
सर्वप्रथम पीक पाण्याविषयी सांगायचं झालं तर, जूनमध्ये कमी पाऊस असेल जुलैमध्ये साधारण पाऊस असेल, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा इशारा या भेंडवळच्या माध्यमातून सांगतांना दिसून आले. भेंडवळच्या भविष्यवाणी नुसार यावर्षी सप्टेंबर मध्ये कमी पाऊस असेल.
त्यानंतर पिकांचे विषयी भाकीत करण्यात आले. यावर्षी पिके सर्वसाधारण राहणार आहेत. राजकीय भाकीत सुद्धा करण्यात आले असून राजा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. मठाजवळ विंचू दिसल्याने देशात रोगराई वाढणार असल्याचे भाकीत आजच्या भेंडवळच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे
पिकांच्या बाबतीत काय आहे भाकीत ?
१)अंबाडी :
सुरुवात अंबाडीपासून होत असते. अंबाडीचे साधर्म्य अंबादेवीशी असल्याने त्या पिकाचा जीवन मानावर परिणाम समजला जातो. यावर्षी अंबाडी विखुरलेल्या स्तिथीत आढळ्याने रोगराई राहणार असून पिकही
सर्वसाधारण राहणार आहे.
२) कापूस :
मागील वर्षात कापसाची परिस्थिती चांगली दाखवली होती, परंतु बाजारभाव मध्यम सांगण्यात आला होता. यावर्षी कापूस हे पीक सर्वसाधारण आहे. पिकावर रोगराई राहणार असून, भावही सर्वसाधारण राहणार आहे.
३) ज्वारी:
ज्वारी हे पीक सर्वसाधारण येईल. परंतु भावात तेजी राहील. त्यामुळे ज्वारी पेरण्यास हरकत नाही.
४) मूग/ उडीद :
मूग व उडीद हे पीक अत्यंत सर्वसाधारण राहणार आहे.जून मध्ये पाऊस कमी पाऊस असल्याने पेरणी उशीरा झाल्याने उत्पादनात घट येईल. व ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी असल्याने त्या पिकाची नासाडी होईल असा अंदाज वर्तवला आहे.
५)तीळ:
तीळ पिकाची खूप नासाडी या भाकितात वर्तवली आहे.
६) तूर :
तूर हे पीक चांगले येईल.कारण अवकाळी पाऊस भरपूर असल्याने तुरीचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे.
देशात पशुवर, मानवावर रोगराई राहील, देशाचा राजा हा कायम राहणार असून तो तणावाखाली राहणार असल्याचे या भाकितात सांगण्यात आले.
तर अश्याप्रकारे भेंडवळचे भाकीत सांगण्यात आले.हि माहिती सर्व शेतकऱ्यांकडे पोहचवा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!