Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

जमिनीची सुपीकता व योग्य मशागत

 Jaminichi Supikata v Yogya Mashagat नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमिनीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्याकरिता आपल्या जमिनीचा पोत चांगला असणं...

 Jaminichi Supikata v Yogya Mashagat नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमिनीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्याकरिता आपल्या जमिनीचा पोत चांगला असणं आवश्यक आहे. जमिनीची पोत म्हणजेच जमिनीची सुपीकता. 

गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या बेफाम वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. परंपरागत भारतीय शेतीमध्ये शेतातील पालापाचोळा, गाई म्हशींचा शेण,गोमूत्र झाडांच्या काड्या, फांद्या अशा घटकांद्वारे जमिनीची सुपीकता वाढवली जाते. 

जमिनीची सुपीकता व योग्य मशागत 


भारतात अनेक वर्ष याच पद्धतीने शेती केली जात होती; मात्र सध्या रासायनिक खतांचा वापर वाढू लागला ज्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आणि जर जमिनीची उत्पादकता वाढवायची असेल तर त्याची सुपीकता टिकवण्यासाठी योग्य गोष्टींचा वापर करायला हवा या भागात आपण बघूया जमिनीची सुपीकता टिकवण्याची योग्य पद्धत व मशागत. 

आज आपण जमिनीची सुपीकता टिकवण्याची योग्य पद्धत याबाबत बोलणार आहोत. यामध्ये पिकाला लागणारे सर्व घटक उदाहरणार्थ हवा,पाणी,मुख्यअन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत संतुलित प्रमाणात उपलब्ध होणे. आणि याचा सतत पिकाच्या मुळांना पुरवण्याचे क्षमतेला आपण जमिनीची सुपीकता असे म्हणतो. 

सेंद्रिय कर्ब व त्याचे कार्य 👇


आपल्या भागामध्ये साधारणतः मध्य भारत आणि विदर्भामध्ये चिकन मातीयुक्त जमिनी आढळतात. यामध्ये चिकन मातीचे प्रमाण बरेच आढळते या चिकन मातीला बांधून ठेवणारा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. तरी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर जमिनीत अयोग्य झाले तर आपल्याला चिकन मातीच्या गुणधर्मावर याचा बराच परिणाम आढळतो. आणि जमिनीचे गुणधर्म त्यामुळे खराब होतात. सध्या आपण जमिनीमध्ये जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहोत, आणि रासायनिक खते वापरून आपण पीक उत्पादन घेतो. 

जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जसे की शेणखत हिरवळीचे खत आणि पिकांचा पाला पाचोळा शेतकरी जाळून टाकतात. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्याला जर चिकन माती आणि सेंद्रिय पदार्थाची प्रमाणाची बरोबरी साधायची असेल तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे 0.60% एवढे आपण ठेवायला पाहिजे. यासाठी आपण जमिनीच्या कोणत्या कोणत्या गुणधर्मावर सेंद्रिय कर्बचा परिणाम होतो हे आता आपण पाहू. 

आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले तर जमिनीच्या सर्वच गुणधर्मावर याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ भौतिक गुणधर्म, जमिनीचे भौतिक गुणधर्म यामध्ये आपल्या जमिनीचा निचरा हा अयोग्य होतो.दुसरा रासायनिक घटकांचा जो दुष्परिणाम सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे होतो यामध्ये अन्नद्रव्याचे असंतुलन  निर्माण होते.

जमिनीत चुनखडी तयार होणे


तसेच ज्याला पीएच म्हणतो, हा सामू आपल्या जमिनीचा वाढतो. यामध्ये काही रासायनिक प्रक्रिया होतात जसे की, चुनखडी तयार होणे. जमिनीमध्ये आपल्याला वाटते की चुनखडी ही खडकांमधून आलेली आहे. पण जमिनीमध्ये सुद्धा चुनखडी तयार होते, या हवामानामध्ये उष्ण हवामान असल्यामुळे आणि पाऊस कमी असल्यामुळे चिकन मातीचे जमिनीमध्ये चुनखडी तयार होते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीमध्ये कमी झाल्यास, आपल्याला चिकन माती आणि सेंद्रिय कर्ब याचे प्रमाण योग्य साधण्याकरता सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे 0.60% असणे आवश्यक असते. याच्या जवळपास प्रमाणात असल्यास जमिनीचे गुणधर्म हे चांगले राहतात. पण जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले तर याचा जमिनीच्या सर्व गुणधर्मावर प्रभाव पडतो. आणि जमिनीचे गुणधर्म बिघडतात. उदाहरणार्थ भौतिक गुणधर्म.

यामध्ये अयोग्य निचरा पाण्याचा निचरा जमिनीमधून योग्यरीत्या होत नाही. दुसरे म्हणजे जमिनीची धूप होणे. चांगले कसदार माती आणि पाणी पाण्यासोबत वाहून जाते. तसेच जमिनीमध्ये उत्तमरीत्या अन्नद्रव्याचे संतुलन राहत नाही. आणि अन्नद्रव्याचे संतुलन बिघडते. जमिनीमध्ये जो जमिनीचा पीएच किंवा ज्याला आपण सांमु  म्हणतो हा सुद्धा वाढतो आणि जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण वाढते. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यास काही प्रमाणात क्षार जमिनीमध्ये साचतात आणि जमिनीमध्ये जमिनीची क्षारता वाढते. याचा पिकावर दुष्परिणाम होतो.

तसेच जमिनीचे जैविक गुणधर्म सेंद्रीय कर्बामुळे चांगले टिकून राहतात आणि सेंद्रिय कर्ब जर योग्य प्रमाणात असेल तर जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या योग्य राहते आणि जे मुळाजवळ जे जिवाणू कार्य करतात, त्यांची सुद्धा संख्या ही योग्य प्रमाणात ठेवल्या जाते या. भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्मानुसार आपण जर सेंद्रिय कर्ब जर योग्य प्रमाणात ठेवला तर जमिनीचे गुणधर्म चांगले राहतात. 

आपण रासायनिक खत टाकतो पण रासायनिक खताची कार्यक्षमता आपल्याला योग्यरित्या मिळत नाही. याचे कारण म्हणजे सेंद्रिय पदार्थ जर जमिनीमध्ये कमी असेल, आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर कमी असेल तर रासायनिक खताची जी कार्यक्षमता आहे, म्हणजे एक किलो नत्र दिल्यानंतर आपल्याला जितके उत्पादन मिळायला पाहिजे त्यापेक्षा कमी उत्पादन मिळते. आणि याचा परिणाम या रासायनिक खताच्या कार्यक्षमतेवर सुद्धा आहे, 
तसेच रासायनिक खत आपल्या जमिनीमधून वाहून जाते. आणि खतांचा नुकसान होऊन इतर मात्र जलस्त्रोतांचे प्रदूषण त्यामुळे होते. 

जमिनीची मशागत 


सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीमध्ये योग्य ठेवण्याकरता आपल्याकडे बरेचसे तंत्रज्ञान उपलब्ध आहे,आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य प्रमाणात वाढवू शकतो. यामध्ये सर्वात पहिले पहिले गोष्ट म्हणजे, जमिनीची मशागत जमिनीची मशागत करताना आपल्याला योग्य काळजी घ्यावी लागते. 

आणि जर आपल्याला सेंद्रिय कर्बाचे नुकसान कमीत कमी व्हायचे असेल तर जमिनीची मशागत ही योग्य वेळी, म्हणजेच  जमिनीमध्ये काही प्रमाणात ओलावा असताना करायला पाहिजे. तसेच यंत्राच्या साह्याने जेव्हा आपण खोल नांगरटी करतो तेव्हा सेंद्रिय कर्बाचे उन्हाळ्यामध्ये खूप नुकसान होते.आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये कमी होतो. त्यामुळे खोल नांगरटी न करता आपल्याला कमीत कमी मशागत जमिनीची जर केली, तर यामध्ये सेंद्रिय कर्ब हा टिकून राहतो केंद्रीय कर्बाचे  प्रमाण योग्य राखण्याकरता म्हणजे 0.60% च्या जवळपास राखण्याकरता आपल्याला मदद होते. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच्छादना चा वापर करणे महत्त्वाचे ठरते यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये जे गवत काडीकचरा किंवा पिकांचे अवशेष उपलब्ध आहे याचा आपण आच्छादन म्हणून वापर करू शकतो. आच्छादनाचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये पाणी टिकून राहते आणि पाणी बाष्पीभवनाने त्याचे नुकसान होत नाही. आणि हा ओलावा टिकल्यामुळे सेंद्रिय कर्ब सुद्धा जमिनीमध्ये टिकुन राहतो. 

त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची धूप कमी करणे. म्हणजे जमिनीची धूप कशी व्हायलाच नाही पाहिजे आणि आपण यामध्ये बरेचसे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जसे की आपण शेताची बांध-बंधिस्ती योग्यरीत्या करू शकतो. आपण बेड वर पेरणी करू शकतो ज्यामुळे पाणी अडेल आणि पाणी आपल्या शेतामध्ये जिरेल आणि माती सुद्धा याच्यापासून वाहून जाणार नाही.

पूर्ण शेतातले पाणी आपण बांधावर एखादं शेततळं खोदून  ते पाणी आपण साठवून ठेऊ शकतो,आणि रब्बी पिकासाठी सुद्धा अशा पाण्याचा वापर नंतर करता येतो.यामुळे जमिनीवर सतत पीक राहिल्यामुळे आणि सतत ओलावा टिकून राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे नुकसान होत नाही. आणि सेंद्रिय कर्ब हा योग्य प्रमाणात जमिनीमध्ये वाढतो .

सेंद्रिय कर्ब उत्तम राखण्याकरता काय करावं?


सेंद्रिय कर्ब उत्तम राखण्याकरता आणि त्याचे प्रमाण चांगले ठेवण्याकरता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एकत्रित अन्नद्रव्य किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे गरज आहे. यामध्ये आपण अन्नद्रव्य पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करताना नुसतं रासायनिक खतावर अवलंबून न राहता आपण जर सेंद्रिय पदार्थ त्या जमिनीमध्ये पुनर्वापर केला. जमिनीमध्ये जे पिकांचे अवशेष आहेत ते आपण जर मिसळून दिले, आपण जर हिरवळीचे खत वापरली. आपण जर कंपोस्ट आणि शेणखताचा वापर जर जमिनीमध्ये वाढवला, तसेच जिवाणू खते सुद्धा उपलब्ध आहेत,ती आपण बियाण्याला लावण्याकरता किंवा आपण मातीमध्ये मिसळून देण्याकरता सुद्धा जिवाणू खतांचा उपयोग करू शकतो.

यामध्ये जिवाणू हे हवेमधील नत्र जमिनीमध्ये साठवतात. मुळाजवळ ज्या गाठी असतात त्यामध्ये नत्र साठवल्या जातो आणि पिकाला हा नत्र उपलब्ध होतो.तसेच जो स्फुरद हा मिनरल फॉर्ममध्ये असतो किंवा जो पाण्यामध्ये विरघळत नाही, तर जिवाणू कार्य करून त्यास सुरतला विरघळतात आणि तो पिकाला उपलब्ध होतो. अशा प्रकारे आपण अन्नद्रव्याचे संतुलन जमिनीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून चांगले ठेवू शकतो.

जमिनी मध्ये सुपीकता  योग्य राखण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जमिनीची तपासणी करायला पाहिजे. आणि जमिनीची जर आपण तपासणी केली तर यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीमध्ये किती आहे हे कळते. तसेच मुख्य अन्नद्रव्याचे प्रमाण आपल्या जमिनीमध्ये कसे आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण जमिनीमध्ये कसे आहे किती प्रमाणात आहे कमी, आहे मध्यम, आहे की जास्त आहे हे त्या प्रयोगशाळेतल्या आकडेवारीवरून आपल्याला कळते, तर आपण जर जमिनीची तपासणी केली, मातीची जर आपण तपासणी केली, शेतामध्ये तर आपल्याला संपूर्ण त्या मातीचा जे रासायनिक गुणधर्म आहे ते आपल्याला माहिती होतात, आणि त्यानुसार आपण खतांची बचत करू शकतो, 

जसे रासायनिक खत आपण योग्य प्रमाणात शिफारसीनुसार देऊ शकतो काही शेतकरी जास्त खत वापरतात. आणि ते पिकांना उपयोगी न पडता तसेच त्या खताचे नुकसान होते ते वाहून जाते,आणि प्रदूषण करते. आणि काही शेतकरी जे कमी खत वापरतात म्हणजे जे शिफारशी पेक्षा कमी खत वापरतात त्यांना योग्य उत्पादन मिळत नाही. आणि उत्पादनामध्ये घट येते. तरी आपण जर जमिनीची मातीची आपण तपासणी केली तर आपल्याला सेंद्रिय कर्बाचे  प्रमाण किती आहे हे कळेल ,आणि ते  जर कमी असेल तर ते वाढवण्याकरता आपण सेंद्रिय पदार्थांचा  जमिनीमध्ये आपण वापर वाढवू शकतो. 

जमिनीच्या मातीच्या तपासणीमध्ये आपल्याला जमिनीचा सामू ज्याला आपण पीएच म्हणतो हा आपल्या जमिनीचा पीएच किती आहे हे कळतो. जमिनीचा पीएच चांगल्या पीक उत्पादनासाठी आपल्याला 6.5 ते 7.5 इथपर्यंत असावा लागतो. हा न्यूट्रल पीएच आहे, यामध्ये सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता ही चांगली असते. जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे  प्रमाण कमी झाले तर जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण वाढते. चुनखडीचे प्रमाण आपल्या हवामान गरम असल्यामुळे उष्ण असल्यामुळे या भागांमध्ये जमिनीमध्ये चुनखडी तयार होते. आणि त्याच्यामुळे आपला जमिनीचा जो सामू आहे पीएच आहे हा वाढतो. 

पीएच वाढल्यामुळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यांचं ऑक्साईड तयार होऊन त्यांचे प्रेसिफिकेशन जमिनीमध्ये होते, आणि ते पाण्यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात राहत नाही, आणि त्यामुळे ते पिकांना उपलब्ध होत नाही चुनखडीयुक्त ज्या जमिनी झालेल्या असतात, त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण हे अत्यंत कमी झालेले आहे. 

तसेच जो महत्त्वाचा घटक आहे पीक उत्पादनातला नत्र,स्फुरद आणि पालाश या तीन पैकी हा स्फुरद आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम सोबत संयोग करतो आणि तो तिथे प्रेसिपिटेशन त्याचा तयार करतो. त्यामुळे स्फुरदचा जमिनीमधील जे विरघळलेला प्रमाण आहे पाण्यातील प्रमाण आहे हे अत्यंत कमी होऊन जाते. ते प्रमाण कमी झाल्यामुळे स्फुरद हा पिकाला उपलब्ध होत नाही. तरी आपण जर आपल्या जमिनीचा सामू कमी करायचा असेल म्हणजे चुनखडीमुळे जर वाढलेला सामू कमी करायचा असेल, तर आपण जर सेंद्रिय पदार्थाचा वापर केला पाहिजे. 

शेणखत वापरले तर काय होईल की जमिनीमध्ये सेंद्रिय आम्ल तयार होईल सेंद्रिय आम्ल तयार झाल्यामुळे हा जो जे जो प्रेसिपेटेड तयार झालेला आहे स्फुरदचा किंवा कॅल्शियमचा हा प्रिसिपेटेड त्या आम्लामध्ये विरघळेल आणि जमिनीमध्ये स्फुरदचे प्रमाण किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण जमिनीमध्ये वाढेल.

हिरवळीची खते 


ग्रीन मॅन्युरी किंवा जे हिरवळीचे पीक आहे जसे की बोरू आहे ,तुमचा ठेंचा आहे चवळी, मूग आहे उडीद आहे असे पीक आपण जमिनीवर फुलावर येईपर्यंत पेरून, नंतर जमिनीत गाडू शकतो. बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नाही. असलं तर महाग आहे उपलब्ध होत नाही. अशा वेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ तयार करून, परत त्याचा पुनर्वापर किंवा त्याचा रिसायकलिंग जमिनीमध्ये करू शकतो, असे केल्याने आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. जर आपण सेंद्रिय कर्ब योग्य ठेवला तर चिकन मातीशी त्याची योग्य घडण  होते आणि चिकन मातीचे गुणधर्म सर्व भौतिक रासायनिक जैविक गुणधर्म आपल्याला चांगले मिळतात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता  दीर्घकाळपर्यंत टिकून राहते.

धन्यवाद मित्रांनो, तुम्ही पूर्ण लेख वाचलात. तुम्हाला जर लेख आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये लिहा. धन्यवाद

No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!