Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

अपंगांसाठी नवी योजना: महाशरद पोर्टल वर नोंदणी करा

Registration for Mahasharad Portal 2023 दिव्यांगांसाठी  महाराष्ट्र सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे. सदर पोर्टलरूपी अभियान यासाठी आहे कि म...

Registration for Mahasharad Portal 2023 दिव्यांगांसाठी  महाराष्ट्र सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे. सदर पोर्टलरूपी अभियान यासाठी आहे कि महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांसाठी साहाय्य उपलब्ध होण्याची उत्तम संधी आहे. या Mahashard Portal द्वारे दिव्यंग्य व्यक्ती सरळ सरळ थेट शासनाच्या मंचाद्वारे मदतीची मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क विधिनियमातील विशेष नमूद केलेल्या या पोर्टल वर नोंदणी करून त्यांना आवश्यक असणारी मदत ते मागू शकतात. त्या पोर्टल वर नोंदणी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत 

nahasharad_portal_registration





अपंगांसाठी नवी योजना: महाशरद पोर्टल वर नोंदणी करा.


नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे असेच कशी नोंदणी करावयाची आहे? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर अजिबात चिंता करू नका. मी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे.त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही.आता आपण यासाठी कोणते कोणते कागदपत्रे लागतील ते आपण पाहू.

नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे (Documents for Registration)


१)  U D I D कार्ड ( भारत सरकारचे दिव्यांगांसाठी  काढलेले स्मार्ट कार्ड,Unique Disability ID  (UDID) 
२) आधार कार्ड 
३)  इ मेल असणे आवश्यक आहे.
४)  मोबईल असणे आवश्यक आहे.

नोंदणी कशी करायची


'Registration for Mahasharad Portal 2023' नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या नागरिक सुविधा केंद्रात, CSC सेंटर (CSC Center) वर जाऊ शकता. किंवा तुमच्या मोबाईल मध्येही तुम्ही नोंदणी करू शकता.ती नोंदणी कशी करायची ती आपण पाहू.सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही शरद पोर्टल हि वेबसाईट उघडायची आहे. किंवा तुम्हाला हे निळ्या अक्षरात महाशरद पोर्टल  ( Mahasharad Portal)हे नाव दिसतंय त्यावर तुम्ही क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल, त्यात अगदी वरच्या बाजूला तुम्हाला मराठी भाषा निवडायची आहे.नंतर दिव्यांग नोंदणी अर्ज असा फ्रॉम तुम्हाला दिसेल. त्याखाली तुम्हाला तुमचा UDID नंबर(Unique Disability ID) टाकल्यानंतर तुम्हाला सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचे आहे. 

नोंदणी फार्म उघडेल त्यात तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरा. काही बाबी आपोआप आलेल्या असतील काही बाबींचा तुम्हाला समावेश करायचा आहे. सर्व भरून झाल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. व OTP येईल.OTP टाकून तुम्ही विरिफाय करून घ्या. व थोडे खाली आल्यावर स्वतः साठी नोंदणी करा. अश्या प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता. 

नोंदणी करायला अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, किंवा CSC सेंटर वर जाऊन नोंदणी करू शकता.

महाशरद पोर्टल चे फायदे 


महाशरद पोर्टल वर तुम्ही तुम्हाला काही मदत पाहिजे असल्यास सांगू शकता. या पोर्टल वर एखादा दानशूर व्यक्ती, एन.जि.ओ. हे सुद्धा नोंदणी करू शकतात. जर त्यांना दिव्यांगांना मदत करायची असेल तर ते तिथून करू शकतात. व दिव्यांग व्यक्ती ला सुद्धा त्याचा प्रत्यक्ष लाभ होतो. व सरकारने हे माध्यम तयार करून दिले आहे.

तर अजिबात वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर 'Registration for Mahasharad Portal 2023"वर जाऊन नोंदणी करून घ्या. व तुमच्या सर्व मित्रांना हि माहिती शेअर करायला विसरू नका. सर्व विव्यान्ग वाट्सअँप ग्रुप वर हि माहिती पोहोचवा. धन्यवाद.



No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!