Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

अरे बाप रे...!क्विंटलला एक लाख रुपये भाव

Faydyachi sheti, Quintal la Lakhacha Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाढत चाललेला उत्पादन खर्च, बिन भरवशाचा पावसाळा, गगनाला भिडलेले बियाणे, ख...


Faydyachi sheti, Quintal la Lakhacha Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाढत चाललेला उत्पादन खर्च, बिन भरवशाचा पावसाळा, गगनाला भिडलेले बियाणे, खते, मजुरी यांचे भाव याने शेतकरी खूपच मेटाकुटीला आलाय. अशातच शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो. विविध नवनवीन पिके तो आपल्या शेतात घेत असतो.परंतु त्याला पाहिजे तसा भावही मिळत नाही. 

त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला नवा पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. भारत सरकारनेही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे.यासाठी चिया बियाण्यासारखं पीक मोठी भूमिका बजावू शकते. या भागात आपण चिया पिकाबद्दल अजून जाणून घेणार आहोत.

Chiya_Lagwad 

फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव Faydyachi sheti, Quintal la Lakhacha Bhav 

दिनांक ०९/०४/२०२३ रोजीच्या दैनिक लोकमत मध्ये एक बातमी वाचली. कृषी विकास प्रतिष्ठाण च्या धान्य महोस्तवात एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया बियाण्याला चक्क किलोला १००० रु भाव मिळाला.आणि मनात  प्रश्न निर्माण झाला खरंच चिया बियांच्या लागवडी तुन एका एकर मधून एवढे उत्पन्न येऊ शकते?आणि त्याची अधिक माहिती घेतली असता असे लक्ष्यात आले कि दुष्काळी भागात कमी पाण्याच्या भागात सुद्धा चिया बियाण्याची लागवड वरदान ठरू शकते.

चिया बियाणे म्हणजे काय?

पारंपरिक शेतीला चिया बियांची लागवड हा पर्याय ठरू शकतो.चिया बियाणे पिकाला अमेरिकेत तर सुपर फूड म्हणून संबोधले जाते.सल्व्हिया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव.हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेस्किको व ग्वाटेमाला इथले हे पारंपरिक पीक आहे.भारतात सुद्धा मध्यप्रदेश मध्ये हे पीक काही भागात शेतकरी घेत असतात. इतर राज्यातही या पिकाचा हळूहळू प्रसार होत आहे. कमी कालावधीत जास्त नफा देणारे पीक म्हणून शेतकरी आता चिया बियाण्याच्या या पिकाला ओळखू लागले आहेत.

चिया लागवड

जागतिक स्तरावर चिया बियांच्या वाढत्या औद्योगिक वापरामुळे त्यांची मागणी वाढली आहे.चिया लागवड हि संपूर्णपणे सेंद्रिय आहे.याला कसल्याही रासायनिक खताची आवशकता नाही, ना फवारणीची आवशकता नाही. या चिया बियाण्याच्या पिकाला एक वेगळाच वास असल्या कारणाने जनावरे सुद्धा याला तोंड लावत नाहीत. या पिकाची मुखत्वे दोन प्रकारे लागवड केली जाते.एकराला सुमारे दीड ते दोन किलो बियाण्याची आवश्यकता असते.एका पद्धतीत फवारणी तंत्राद्वारे याची लागवड केली जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रथम रोपवाटिके मध्ये चिया बियांच्या रोपांची लागवड केली जाते. व नंतर आपण ज्या पद्धतीने भात लागवड करतो त्या पद्धतीने त्यांची लागवड करता येते. या पद्धतीत अर्ध्या किलोमध्ये आपले काम भागून जाते.

जमिनीची आवश्यकता 

चिया बियाण्याच्या पिकाला चिकन वालुकामय पोत असलेली चांगल्या निचऱ्याच्या जमिनीची आवश्यकता असते. हे पीक एक फुले असलेले पीक आहे.लागवडी पूर्वी जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे.लागवडीसाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने जास्त अनुकूल आहेत. चिया पीक हे ११० ते १३० दिवसात काढणीला येते.हे पिकाला सिंचनाची फारशी गरज भासत नाही. 

काढणीच्या वेळेला हे पीक उपटून घेऊन.अगोदर चांगले वाळू द्यावे त्यानंतर त्याची मळणी करावी.एका एकरातून साधारणतः ५ ते ६ क्विंटल उत्पादन निघते असे पीक घेणारे शेतकरी सांगतात. चिया बियांची किंमत सध्या किलोला १००० रु आहे. तर आपण शेतात सहज ५ ते ६ लाख एकरी कमावू शकतो.

हि माहिती अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा. माहिती वाचल्या बद्धल धन्यवाद.कमेंट नक्की करा.

वॉट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा - 👉क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा -  👉क्लिक करा
No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!