नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची जमीन मशागत चालू असेल. नवीन खरीप हंगामाची शेतकरी मोठ्या आशेनं वाट पाहतोय. यावर्षी...
Yanda_kasa_aahe_pavsacha_andaj |
यंदा कसा राहील पावसाचा अंदाज? Yanda kasa Rahil Pavsacha Andaj?
यावर्षी मान्सून सामान्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेट ने सोमवारी व्यक्त केला. स्कायमेटच्या मान्सून पूर्वानुमाना नुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ८१६.५ मी.मी. पाऊस पडणार आहे. तो जवळपास मागील मान्सून च्या तुलनेत ९४% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.स्कायमेटने जे ४ जानेवारी ला भाकीत केले होते तेच कायम राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्कायमेटचे प्रबंध निदेशक श्री.जतीन सिंह यांच्या म्हणण्यानुसार ट्रिपल-डीप-ला नीना च्या माध्यमातून मागील चार हंगामात सामान्य किंवा सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ला नीना चा प्रभाव संपला असल्याचे त्यांनी सांगितले.
अल नीनो सगळे चक्र फिरवणार
ला नीना मुळे समुद्राचे पाणी झपाट्याने थंड होते त्यामुळे सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडतो.भारतात कमीअधिक प्रमाणात पाऊस, कमीअधिक थंडी हि ला नीना वर अवलंबून असते.आता तुम्ही म्हणाल हे ला नीना अन हे अल नीनो काय भानगड आहे.तर ला नीना आणि अल नीनो हे (El Nino and La Nina) हवामानातले गुंतागुंतीचे बदल आहेत. जे विषुवृत्तीय प्रशांत महासागर क्षेत्रातील समुद्राच्या तापमानाच्या लहरीपणामुळे निर्माण होतात.
तर असो,तर प्रशांत महासागराच्या वायुमंडळात अल नीनो चा प्रभाव वाढण्यास अनुकूल वातावरण तयार झाले असल्याने पाऊस कमी पाडण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकते.अल नीनो ने समुद्राचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते.
अल नीनोच्या शिवाय जो वातावरणातील बदल मान्सून ला प्रभावी ठरू शकतो तो म्हणजे इंडियन ओशन डिपोल(IOD). हा जर इंडियन ओशन डिपोल जर सामान्यांपेक्षा जास्त मजबूत झाला तर तो अल नीनो च्या दुष्प्रभावाला आवर घालू शकतो.
महाराष्ट्रात कसा राहील पाऊस?
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात जुलै आणि आगस्ट मध्ये सामान्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे.महिण्यावारी पाऊस कसा पडेल ते आपण पाहू.
💠 जून- सरासरीच्या ९९% (शक्यता ८०%)
💠जुलै - सरासरीच्या ९५% (शक्यता ७०%)
💠ऑगस्ट -सरासरीच्या ९२% (शक्यता ४०%)
💠सप्टेंबर - सरासरीच्या ९०% (शक्यता ३०%)
स्कायमेटने घोषित केलेल्या भाकितामुळे बळीराजामध्ये चिंतेचे वातावरण आहे.स्कायमेट चा अंदाज चुकीचा ठरो, व यावर्षी चांगला पाऊस होवो हीच ईश्वर चरणी पार्थना. तुम्हाला काही कमेंट करायचे असतील तर नक्की करा. व हि माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यास माझी मदत करा.धन्यवाद.
वॉट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा👉 क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा 👉 क्लिक करा
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!