Mati Parikshan aani Jaminichi Supikata नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माती परीक्षण कसे करायचे? ते केल्याने आपले उत्पादन कसे वाढेल, असेच आप...
Mati_parikshan_aani_jaminichi_supikata |
माती परीक्षण आणि जमिनीची सुपीकता
सॉईल टेस्टिंग अर्थात माती परीक्षण केल्यानंतर आपल्या मातीमध्ये आपल्या शेतामध्ये नत्र,स्फुरद,पालाश यापैकी कोणकोणते घटक आहेत किंवा मायक्रो न्यूट्रिएंट, जे आपण ज्याला म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो याची किती कमतरता आहे. जमिनीचा पोत कसा आहे सेंद्रिय कर्ब किती आहे? हे सगळं आपल्याला कळतं. आणि त्यानुसार आपला खर्च सुद्धा वाचतो. आणि नेमकी ती गोष्ट आपल्या शेताला दिल्या जातील, परिणामी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. आणि जमिनीचा पोच सुधारण्यास मदत होते.तर माती परीक्षण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत .
जमिनीचे प्रकार
आपल्या जमिनीचा विचार जर केला, तर जमिनीमध्ये ते माती आणि मातीला तीन आयाम असतात. एक लांबी, दुसरा रुंदी आणि तिसरा म्हणजे खोली. खोली म्हणजे काय तर आपली मूळ किती खोलपर्यंत जातात. त्याच्यावर सुद्धा आपलं उत्पादन आणि जमिनीचा एकंदर पोत डिपेंड असतो. त्यानंतर महत्त्वाचं घटक म्हणजे जे जमिनीमध्ये असतात, खनिज पदार्थ 45% ,5% सेंद्रिय पदार्थ असतात, आणि 25% हवा आणि 25% पाणी अशा पद्धतीने आपली जी माती बनलेली असते.
आता जर आपण जर बघायला गेलं तर आपण बऱ्याच वेळेस नांगरणी करायला घेतो, नांगरणी करायला घेतल्यानंतर तुमचे जे जमिनीतून ढेकळं निघतात, ते ढेकळ जर अति कडक असतील, अनवायी पायाने जर आपण चालू शकत नसु, ती ढेकळं जर आपल्याला जास्त प्रमाणात कडक झाल्यासारखी वाटत असतील.तर आपली जमीन नापिकेकडे चालली आहे हे लक्ष्यात घ्यावं. जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे तुमच्या सेंद्रिय कर्ब हा 0.30% पेक्षा कमी आलेला आहे, तो तुमचा 0.40% पेक्षा जास्त असायला हवा. मुळामध्ये जर आपले जे जिवाणू आहेत जमिनीमध्ये जिवाणू जर मृत झाले, तर तुमची जमीन किंवा तुमची माती ही मृत घोषित करावी लागेल. अर्थात हे जमिनीचा सगळा खेळ तसा माणसाचा श्वासावर डिपेंड आहे तसा जमिनीचा जिवाणूंवर डिपेंड आहे. म्हणून जिवाणूंना जपा.
जमिनीचे विविध गुणधर्म
आता आपण जमिनीचे गुणधर्म जाणून घेऊ.जमिनीच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म येतो तो म्हणजे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये काय? तर जे गुणधर्म आपल्याला दिसू शकतात.जसे जमिनीचा रंग, जमिनीचा रंग कसा आहे काळा आहे, पांढरा आहे, लाल आहे. यापैकी आपण ते आपल्याला कळतं किंवा जमिनीचा रंग कसा आहे? त्यानंतर जमिनीचे जलधारण क्षमता. त्यानंतर जमिनीचा पोत, त्यानंतर जमिनीची घनता. म्हणजेच काय तुमची जमिनीच्या पिकामध्ये तुमची मूळ ही किती खोलपर्यंत जातात हे आपल्याला कळतं. याला आपण काय म्हणतो भौतिक गुणधर्म म्हणतो.
मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि डिटेल हे सांगतो. आणि पुढे आपण स्टेप बाय जाणार आहोत. त्यानंतर येतात रासायनिक गुणधर्म. त्याच्यामध्ये अन्नद्रव्य, क्षारता, सामू, चुनखडी इत्यादी प्रकार येतात, त्यानंतर तिसरा आहे जैविक गुणधर्म. जैविक गुणधर्म मध्ये बुरशी आणि जीवाणू या दोन गोष्टी येतात. बुरशी म्हणजे काय, दोन प्रकारच्या बुरशी असतात, दोन प्रकारचे कीडक सुद्धा असतात, मित्र कीटक आणि शत्रू कीटक. आणि बुरशी सुद्धा दोन प्रकारचे असते शत्रू बुरशी असते मित्र बुरशी असते. उदारणार्थ ट्रायकोडर्मा हे आपली मित्र बुरशी आहे. तर हे असतं जैविक गुणधर्मामध्ये. त्यानंतर समस्या युक्त जमिनीचे प्रमाण आपण बघू त्याच्यामध्ये काय येत पाणथळ, चुनखडीयुक्त, क्षारयुक्त आणि चोपण जमीन येते.
तर त्याच्यामध्ये पाणथळ म्हणजे काय? ज्या ठिकाणी पाणी साचतं ती पाणथळ जमीन. म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन कशी तुम्हाला करता येईल ते करा. त्यानंतर चुनखडी जमीन म्हणजे काय? की त्या ठिकाणी मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही, जमीन खालून स्लॅब टाकल्यासारखे होते. भुसभुशीत पणा जमीनीत राहत नाही तिथून चुनखडी जमीन असते तिथे अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप कमी असते.मुळे खोलवर न गेल्यामुळे ते जमिनीतील अन्न शोषून घेऊ शकत नाहीत. त्यानंतर आहे क्षारयुक्त जमीन. हि क्षारयुक्त जमीन कशामुळे होत तर आपल्या पहिलं, पाणथळ म्हणजे काय ज्या ठिकाणी पाणी असतं पाणी साचल्यानंतर ते पाण्याची क्षार तसेच तिच्या वरती राहतात. उत्तम निचरा होणारी जमीन जर तुमच्या असेल, तर क्षारयुक्त जमीन तुमची असणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
जमीन सुपीकतेसाठी घ्यावयाची काळजी
हे सर्व जर तुम्हाला प्रॉपर ओळखून उपाययोजना करायचे असेल. जमीन माती सुपीक करायची असेल तर माती परीक्षण हे तुम्हाला करावंच लागेल. अगदी थोडक्यात जमीन सुधारण्याचे काय काय उपाय आपण करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट खत, लेंडीखत, शेणखत, गांडूळ खत इत्यादी खतांचा वापर केल्याने आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो. ऑरगॅनिक कार्बन आपण ज्याला म्हणतो.
जमीन आपली सुपीक व्हायला सुरुवात होते आणि जिवाणूची संख्या वाढायला सुद्धा या माध्यमातून मदत होते. म्हणून आपल्याला जमीन सुधारण्याच्या उपाय मध्ये हा एक महत्त्वाचा घटक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आहे हिरवळीचे खत. ज्यावेळेस आपलं शेत खाली असतं. दोन-तीन महिन्याचा अवधी असतो. चार महिन्याचे पीक असेल त्यानंतर थोडा अवकाश असतो ,ते तुमच्या खाली त्या वेळेस ढेंचा असेल, ताग असेल जी काही हिरवळीचे खत असतील त्या खतांची लागवड करा. योग्य वेळी ते जमिनीमध्ये गाळा, त्याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी सेंद्रिय कार्बन अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो,जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीची सुपीकता वाढणं गरजेची आहे. जमिनीतील जिवाणूची संख्या वाढणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस तुमची जमीन मृत घोषित करावी लागेल.त्याच्यामध्ये उत्पादन येणारच नाही. तुम्ही कितीही खत टाकले उत्पादन येणार नाही. म्हणून तुम्हाला जिवाणूची काळजी घ्यावी लागेल,
आपण सांगतोय ही काळजीपूर्वक लक्षात घ्या, जे आपले उपपदार्थ असतात, कृषी व्यवसायाचे जे की कुजणारे असतात, जसे शेतातला काडी कचरा, त्याच्यापासून खत निर्माण होतं त्याचा आपण आपल्या शेतामध्ये वापर केला पाहिजे. जेणेकरून सेंद्रिय खत आपल्या शेताला मिळेल. त्यानंतर आपल्याला रासायनिक खताचा भडीमार टाळावा. काही लोकं सेलिब्रिटी आहेत आणि ते सांगतात की आमच्यात कॉम्पिटिशन लागते, यांने एक गोणी खत टाकलं की मी दोन गोणी टाकतो, तसं करू नका. त्याच्यामुळं जमिनीचा सत्यानाश व्हायला लागलेला आहे.
माती परीक्षणाचे महत्व
त्यानंतर आता माती परीक्षणाचे महत्त्व जाणून घेऊ. माती परीक्षण का करायचं तर मी पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं. मला की नेमकं काय झालं ते कळतंय. जमिनीत नत्र असतं, स्फुरद ,पालाच असतं नायट्रोजन.फॉस्फोरस पोटॅश आणि मायक्रो न्यूटन अर्थात सूक्ष्म अन्नद्रव्य लोह,जस्त,तांबे ,मॉलिब्डेनियम, इत्यादी याचं प्रमाण किती आहे सूक्ष्म मूलद्रव्याचे, अन्नद्रव्याचे तुमच्या जमिनीमध्ये प्रमाण किती आहे? नत्राचं किती आहे, स्फुरद किती आहे पालाष किती आहे, हे तुम्हाला कळतं.
जर पालाशचे प्रमाण भरपूर आहे ,तर आपल्या मातीमध्ये मग पालाचा वापर का करायचा? करायची गरज नाही मग त्या ठिकाणी तुमचा पैसा वाचतोय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सरळ खत आणि मित्र खत या दोन गोष्टी आहेत. तर सरळ खत म्हणजे काय? तर नत्र हा वेगळा पॅकिंग असतो पालास वेगळं असतं. आणि जेव्हा आपण माती परीक्षण करतो. त्यानंतर तुम्हाला जर माती परीक्षणाचा अहवाल आला त्या अहवालामध्ये नत्राची भरपूर उपलब्धता आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी नत्राचा वापर करायचा नाही. तिथे तुमचा पैसा वाचतोय. पालाश चा पैसा वाचतोय. मग तुमचं काम होऊन जाते. अशा पद्धतीने माती परीक्षण केल्याने तुमचं सगळ्या सर्वांगीण शेतीचा. पिकाचा सगळाच तुमच्या सगळ्या विकास होणार आहे.
माती परीक्षणाची वेळ
त्यानंतर आहे माती परीक्षणाची वेळ. कधी करावी तर मार्च एप्रिल मे यादरम्यान करावी. जेव्हा तुमचा रब्बीचे जे पीक असतं ते पीक काढलेला असतं. त्यावेळेस तुम्हाला हे करायचं आहे. नमुना घ्यायचा आहे आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांगरणी केल्यानंतर नमुना घ्यायला चालत नाही. नांगरणीच्या आधीच तुम्हाला तो नमुना घ्यायचा आहे. नमुना घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला बरीचशी काळजी घ्यायलालागणार आहे .आपण या जर उभ्या पिकामध्ये तुम्हाला जर माती परीक्षणाचा नमुना घ्यायचा असेल. तर दोन ओळीच्या मधातली माती घ्यावी. आणि जर फळबाग असेल तर दोन झाडाच्या मधातली माती त्या ठिकाणी तुम्हाला माती परीक्षणासाठी घ्यायचे आहे.
त्यानंतर माती परीक्षणासाठी काय उपकरण वापरली जातात, तर ते एग्रीकल्चर कॉलेजमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्र मध्ये वेगळी उपकरणे असतात. पण शेतकरी फावडी त्यानंतर टिकाऊ काही ठिकाणी टीकास म्हणतात. प्लास्टिकची बाटली असावी पिशवी असावी सोबत, किंवा ते जे खणण्यासाठी आपण जर वेळूची काठी जर वापरली तर ती अधिक उत्तम असते. अशा पद्धतीने उपकरण आपण त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंगचा सॅम्पल घेण्यासाठी वापरू शकतो.
माती परीक्षणासाठी नमुना
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमुना कुठून घ्यायचा आणि कुठून नको? आणि कशा पद्धतीने जमिनीचे वर्गीकरण करून नमुना घ्यायचाय. काही लोक काय करतात. काय करायचं मी तुम्हाला सांगतो, समजा तुमचे दहा एकर शेत आहे, तर दोन एकर ही चुनखडीचे आहे, तुमचं जर वर्गीकरण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुकडे पडायचेत, विभाग पाडायचे. त्याचा वर्गीकरण तुम्हाला करायचंय. मग काय करायचंय तुम्हाला काळ्या मातीचे सॅम्पल ते वेगळं घ्यायचंय, चुनखडीच जे आहे ते वेगळं घ्यायचंय, ज्या ठिकाणी पाणी साचतात ते वेगळं घ्यायचंय, क्षारयुक्त जे आहे ते वेगळं घ्यायचंय. म्हणजे हे तुम्हाला आपल्याला कळलं पाहिजे की अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सॅम्पल घ्यायचे आहे. काळ्या मातीचा वेगळं गट पाडा, त्याच्यात गट पाडल्यानंतर वेगवेगळ्या पिशवी ते वेगळे सॅम्पल तुम्हाला घ्यायचे आहेत. ही तुम्ही काळजी घ्या.
माती परीक्षणासाठी नमुना घेतांना घ्यावयाची काळजी
अजून काय काळजी घ्यायची तुम्हाला तर विहिरी जवळचा नमुना घ्यायचा नाही.विहिरीजवळ सॅम्पल घ्यायचं नाही. त्यानंतर बांध जो असतो त्या बांधापासून पाच मीटर अंतरावरचं सॅम्पल घ्यायचं नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचं जे रासायनिक खताच्या बॅग ठेवलेल्या असतात त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही. नमुना घेत असताना रासायनिक खताच्या बॅगमध्ये नमुना घ्यायचा नाही. हे कशामुळे तर त्या ठिकाणी ऑलरेडी ते प्रमाण असतं. त्यानंतर ज्या ठिकाणी शेणखत साठवलेला आहे त्या ठिकाणचा सुद्धा नमुना घ्यायचा नाही. समजा तुम्ही शेतात शेणखत शिंपडले आहे त्या ठिकाण सुद्धा नमुना घ्यायचा नाही. तसा नमुना जर घेतला तर तेच घटक त्या नमुन्यामध्ये जातात ते नमुना आणि त्यानुसारच शिफारस येते. आणि मग नंतर तुमचा सगळा कार्यक्रम बिघडू शकतो. आता नमुने घेत असताना कशी काळजी घ्यायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला नमुने ते घ्यायचे आहेत मी तुम्हाला शेतात वर्गीकरण कसं करायचं ते सांगितलं आणि काळी जमीन याच वर्गीकरण करा त्यानुसार आपल्याला सॅम्पल वर्गीकरण आपण केलंय त्यानंतर आपल्याला झिगझॅक पद्धतीने घ्यावे लागणारआहेत.
माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यायचा
ते मी तुम्हाला सांगितले आता जे पद्धती असतात. एक म्हणजे हंगामी जे आपण पिकं घेतो. आणि दुसरं म्हणजे फळबाग. तर आधी मी हंगामी पिकाबद्दल सांगतो आणि नंतर फळबागीच सांगतो. तर हंगामीच कसं असतं तर हंगामी चा आपण विषमता खड्डा घ्यावा. अशा पद्धतीचा खड्डा घ्यायचा आहे व्ही आकाराचा. त्यामध्ये तुम्हाला ३० ते ४५ से.मी. खोलीचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यातून आपल्या ते सॅम्पल कलेक्ट करायचंय. ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर पद्धतीने तुम्ही दहा-बारा ठिकाणचे नमुने घेणार म्हणजे चार पाच किलो माती तुमची जमा होणार. हे हंगामीच आहे. अजून फळ बागायचं सांगतो फळबाग जर असेल किंवा फळबाग लागावी लावायची असेल तर चुनखड जमीन असेल तर त्या ठिकाणी फळबाग लावायचीच नाही.
आता फळबागाचा सॅम्पल तर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला ९० सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यायचा आहे. आता ९० सेंटीमीटर खोलीचा खड्डा तुम्ही घेतलेला आहे. तर ९० सेंटीमीटर खोलीच्या खड्डा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे त्याच्यामध्ये परत वर्गीकरण करायचं. त्या खड्ड्यामध्ये ९० से.मी. चा खड्डा आहे मग शून्य ते ३० से.मी. ची माती वेगळ्या पिशवीत घ्यायची. तीस ते साठ सेंटीमीटर ची माती वेगळ्या पिशवीमध्ये घ्यायची आणि ७० ते ९० से.मी. ची माती वेगळ्या पिशवीत घ्यायची. लक्षात घ्या परत एकदा सांगतो, सर्व नमुने वेगळ्या पिशवीत घ्या.
खड्डा शेताच्या मध्ये घ्यायचा आहे. आणि चार कोपऱ्यात चार खड्डे घ्यायचेत अशे पाच ठिकाणी सॅम्पल तुम्हाला घ्यायचे. चार ते पाच किलो सॅम्पल तुमचं ते एकत्र नंतर करायचे, नंतर तुम्हाला ते पूर्ण सॅम्पल एकत्र करायचे. आता मी तुम्हाला आधी हंगामात सांगितले नंतर फळबागेच सांगितले.आणि तुम्ही हंगामाचे करत असाल किंवा फळ बागेचं करत असाल पुढची प्रोसेसची सेमच आहे.ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे मिक्स करून आपण ते घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व माती एकत्र करायची सर्व माती एकत्र केल्यानंतर आपण जेवण करतो,चपाती काही ठिकाणी म्हणतात त्या ठिकाणी भाकर म्हणतात त्या भाकर चा आकार गोल असतो ,त्याच्या गोल पद्धतीने ती माती अंतरायाची त्या मातीमध्ये ओलावा असेल तर सावलीत तो ओलावा सुकवायचा आहे उन्हामध्ये सुकवायचा नाही. सावलीमध्ये ती माती सुकून घ्यायची.
गोल आपण जशी आपली भाकर असते.त्यावर उभी आडवी रेष मारून आपल्याला त्याचे चार सामान भाग करून घ्यायचे आहेत. चार भाग पडल्यानंतर एक, दोन, तीन चार असे चार भाग पडले तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय,पहिला आणि चौथा भाग काढून टाकायचा आहे. नंतर सर्व भाग तुम्हाला एकत्र करायचा आहे परत तुम्हाला परत भाकर तयार करायचे आहे. भाकर तयार करायची त्याच्यामध्ये परत एक दोन तीन चार अशा पद्धतीने आकडे टाकायचे एक आणि चार काढून टाकायचा . दोन आणि तीन हा परत मिक्स करायचा हे तुम्हाला कुठपर्यंत करायचे जोपर्यंत एक किलो माती राहत नाही. कारण की तुम्हाला एक किलोचा सॅम्पल द्यायचंय. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करत करत जासाल त्यावेळेस आदर्श मातीचा नमुना तुम्ही तयार करता. आणि नेमकं तुम्हाला परीक्षण त्या ठिकाणी केल्या जात, अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे.
त्यानंतर आपली पूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर एक सव्वा किलो जी माती राहील ती आपण पिशवीमध्ये टाकयची. पिशवीमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पिशवीमध्ये काय टाकायचं,तर शेतकऱ्याचं नाव टाकायचंय तुमची जमिनी बागायची आहे की कोरडवाहू हे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर काय आहे ते टाकायचा आहे. ओलीताचे साधन, जमिनीचा निचरा, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, जमिनीची खोली, नमुना घेतलेली तारीख, मागील हंगामात घेतलेलं पीक, आणि समोरच्या हंगामात कोणतं पीक घ्यायचे ते पीक असं एका चिठ्ठीवर सगळं विवरण लिहायचं पिशवीमध्ये टाकायची. आणि ती पिशवी तुम्हाला सॉईल टेस्टिंगसाठी द्यायची आहे.
आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न पडला असेल आता माती परीक्षण कुठे करावं? तर तुमच्या जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र असतं. अनेक ठिकाणी १५,२०,३०, कि.मी. च्या अंतरावर प्रायव्हेट सॉईल टेस्टिंग लॅब सुद्धा आहेत. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे कृषी महाविद्यालय आहे,जवळपास इत्यादी ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा सॉईल चा रिपोर्ट देऊन माती परीक्षण करून पुढची प्रोसेस करू शकता.
माती परीक्षणाचा अहवाल
जेव्हा आपण आपलं सॅम्पल माती परीक्षणासाठी सॉईल टेस्टिंग लॅबला देतो त्यानंतर काही दिवसात आपला अहवाल येतो. त्या अहवालाचा वाचन कसं करावं हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावर कुठल्या गोष्टी असतात. त्याच्यावर पीएच असतो. म्हणजे काय. तुमच्या जमिनीचा सामू तो जर तुमचा साडे सहा ते साडे सातच्या दरम्यान असेल तर तुमची जमीन सुस्थितीत आहे. तो साडेसहापेक्षा कमी असेल किंवा साडेसात पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असते. त्यानंतर आहे क्षारता, क्षारता म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलं क्षारता जमिनीमध्ये क्षार वाढतात किंवा क्षारयुक्त जमीन का होते तर त्याच्यामध्ये पाणथळ जमीन असते पाणी साचणारी जमीन आणि त्यानंतर ती पाणी साचल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढतं म्हणून जमिनीचा उत्तम निचरा होणारी जमीन जर तुम्ही बनवली तर क्षारता जे आहे ते तुमची नॉर्मल राहील. शारतेच जे प्रमाण आहे ते ०.५% पेक्षा कमी असावं.तर तुमची जमीन सुपीक असते. जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असते.
त्यानंतर आहे चुनखडी. चुनखडीच जे प्रमाण आहे ते चुनखडीच प्रमाण ५% पेक्षा कमी असावं. १०% पेक्षा जास्त चुनखडीच प्रमाण असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही फळबाग लागवड करू शकत नाही. त्यानंतर चुनखडीच प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी खताचे व्यवस्थापक सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब ऑरगॅनिक कार्बन हा आहे .जो सेंद्रिय कर्ब आहे हा ०.४०% पेक्षा जास्त असावा. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब हा ०.३०% पेक्षा आत आलेला आहे. तो वाढवण्यासाठी तुम्हाला कंपोस्ट खत,लेंडीखत, शेणखत, जिवाणूंची संख्या, गांडूळखत इत्यादींचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खत, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ताग, बोरू, ठेंच्या जे आहे ते या सगळ्याचा वापर वाढवणं गरजेचं आहे.तेव्हा तुमची जमीन ही सुपीक होईल आणि तुमचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जमीन भुसभुशीत व्हायला मदत होईल.
आपल्या शेतातील अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खते ३० ते ४०% ,रासायनिक खते ३० ते ४०%, आणि जिवाणू जे आहे ते २० ते २५% किंवा १५ ते २५% अशा पद्धतीने आपलं वर्गीकरण असलं पाहिजे. खताच्या मात्रा आपण अशा पद्धतीने दिल्या पाहिजे. तेव्हा कुठे आपली जमीन ही रासायनिक खतही पचवेल आणि जिवाणूची संख्या हि वाढेल आणि सेंद्रिय कर्बही टिकून राहील. जमिनीची सुपीकता हि टिकून राहील.
अगदी सोप्या भाषेमध्ये हा सॉईल टेस्टिंग ची माहिती माती परीक्षण म्हणजे जमिनीच्या गुणधर्मापासून पार्श्वभूमी नंतर त्याचं वाचन कसं करावं या सगळ्या गोष्टी आपण अगदी डिटेल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितल्या आहेत.हि माहिती नक्कीच इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!