Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

मिरची लागवड संपूर्ण व्यवस्थापन भाग-१

  Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan   मित्रांनो आपलं स्वागत करतो, शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची या पिकाचा संपूर्ण व्यवस्थापन ब...

 Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan मित्रांनो आपलं स्वागत करतो, शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची या पिकाचा संपूर्ण व्यवस्थापन बद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो हिरव्या मिरचीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते, तसेच भारतीय मिरचीला इतर प्रदेशातूनही चांगली मागणी आहे. मिरचीमध्ये  ही जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीला संतुलित आहारात समावेश होतो.

तसेच मिरचीमध्ये फॉस्फोरस, कॅल्शियम आणि खनिज पदार्थ आढळतात म्हणून मिरचीला रोजच्या आहारात महत्त्वाचे स्थान आहे. मिरची मधील तिखटपणा स्वाद या गुणामुळे मिरचीला मसाल्यातीही महत्त्वाचे स्थान आहे.

Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan

जमिनीची निवड

आपण जमीन निवडतांना  मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरची 'mirchi'या पिकास योग्य असते, हलक्या जमिनीत मध्ये योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते. साधारणतः 75 से.मी. पाऊस असलेल्या भागात ओल धरून ठेवणाऱ्या काळ्या कसदार जमिनीमध्ये कोरडवाहू मधेही मिरची चांगली पिकू शकते

जमिनीची मशागत 

शेतीतील पूर्व हंगामी पिकांचे रोगग्रस्त काडीकचरा हे वेचून शेताच्या बाहेर टाकावा. शेताची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी. तसेच जमीन जे आहे ते भुसभुशीत करावी. लागवडी साठी बेड तयार करत असताना, बेडची दिशा ही वाऱ्याच्या  दिशेला लंबकार वारा वाहण्यास अडचणीस ठरेल अशा प्रकारे बेड पाडू नये. म्हणजेच काय तर,उत्तर ते दक्षिण बेड पाडावे कारण उत्तर ते दक्षिण हवा ही खेळती असते. त्यानंतर दोन बेड मधील अंतर जे आहे हे चार ते पाच  फुटापर्यंत तुम्ही घेऊ शकता.

मिरचीचे रोप तयार करणे

मिरचीचे रोप हे घरच्या घरी रोप तयार करत असल्यास शक्य झाल्यास मोठ्या 102 आकाराचा ट्रे वापरावा. घरच्या घरी तयार केलेले रोप किंवा नर्सरी मधून जर तुम्ही रोप घेत असाल तर रोपाची जो कालावधी आहे तो 40 ते 45 दिवस असावा, 40 ते 45 दिवस आतले रोप निवडावं आणि रोप हे निरोगी असावं. 

102 च्या ट्रेनमध्ये जे रोप तयार करण्यास आपण सांगतो त्याचे कारण  की, 102 आकाराचा ट्रे ची खोली हि मोठी असते म्हणजे काय तर त्यामध्ये मुळ वाकत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो एकदा जर मिरचीची सोट-मुळे  जर वाकली तर मिरची "mirchi" 60 दिवसानंतर पूर्ण आकसल्यासारखी किंवा तुम्ही व्हायरस आल्यासारखी दिसते.

Mirchi-lagwad-sampurna-vyavasthapan
Mirchi_lagwad


त्यामुळे मिरचीचे रोप रोपाची सोट मुळे वाकणार नाही याची दक्षता घ्यावीआणि दोन ओळीतील अंतर चार ते पाच फूट ठेवायचं आणि दोन झाडातील अंतर किती आहे हे दीड ते दोन फूट होऊन लागवड करावी. 

मिरची लागवड ही खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते खरीपमध्ये मिरचीची लागवड जी आहे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते जून अखेर पर्यंत करतात तर उन्हाळी मिरचीसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मिरची लागवड करतात.

 तर मित्रांनो आपण या भागात  "Mirchi Lagwad Sampurna Vyavsthapan" मिरची लागवड बद्दल जाणून घेतले. पुढील व्यवस्थापन जसे आळवणी,फवारणी व्यवस्थापण,तसेच खत व्यवस्थापण व इतर बाबी आपण पुढील भागात पाहू.

धन्यवाद. 





No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!