Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

पॅन कार्ड करा आधार ला लिंक मोबाईलवर

 Pan card link with aadhar on Mobile मित्रहो तुम्हाला माहित असेलच, भारत सरकार ने घोषित केले आहे कि पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक करा.त...

 Pan card link with aadhar on Mobile मित्रहो तुम्हाला माहित असेलच, भारत सरकार ने घोषित केले आहे कि पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक करा.तसे न केल्यास तुमचे पॅन कार्ड हे कायमस्वरूपी बंद सुद्धा होऊ शकते.पॅन कार्ड चे किती महत्व आहे हे तुम्हाला माहित आहेच.तर या लेखात आपण मोबाईलवर पॅनकार्ड आधारकार्ड ला कसे लिंक करायचे हे पाहणार आहोत.

पॅन कार्ड करा आधार ला लिंक मोबाईलवर

Pan card link with aadhar on Mobile



pan_card_link_with_aadharcard

भविष्यात सुद्धा पॅन कार्डला खूप महत्व असणार आहे. कारण बँकेच्या खाते काढण्यापासून ते सर्व व्यवहारासाठी कार्ड चा सामान्य लोकांना उपयोग होतो. पॅन कार्ड चे इतर हि बरेच उपयोग आहेत.तर आपण पाहू पॅनकार्ड मोबाईल वर आधार कार्ड ला कसे लिंक करावे. लिंक करायची शेवटची तारीख हि ३१ मार्च २०२३ होती,परंतु ती तारीख वाढून आता ३० जून २०२३ झाली आहे चला तर मग आपणच करू 'pan card link with aadhar'.

मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट असेलच....! तुम्ही जर एखाद्या सायबर कॅफे मध्ये गेलात तर तो दुकानदार तुमच्याकडून लिंक करायचे  शंभर ते दीडशे रुपये घेईल ते तुम्ही वाचवू शकता.तर तुम्ही तुमच्या मोबाइलला वरील ब्राऊजर वर मी जी तुम्हाला वेबसाईट देत आहे ती उघडा. हि इनकम टॅक्स डिपार्टमेंट ची वेबसाईट आहे. किंवा इथे बाजूला इनकम टॅक्स डिपार्टमेंट असे निळ्या अक्षरात दिसत आहे त्यावर क्लीक करा. 

असे करा लिंक आधार 

मित्रांनो वेबसाईट उघडल्यानंतर खाली थोडे स्क्रोल केल्यावर तुम्हाला Link Aadhar असे बटन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Pan_card_link_with_aadharcard 

त्यानंतर एक नवीन इंटरफेस उघडेल त्यात थोडे खाली आल्यावर तुम्हाला त्यात दोन बॉक्स दिसतील त्यात तुम्ही ज्यात पण कार्ड लिहले आहे त्यात पॅनकार्ड नंबर व ज्यात आधार नंबर विचारला आहे त्यात आधार नंबर टाका.व थोडे खाली आल्यावर तुम्हाला Validate हे बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.

व्हॅलिडेट केल्यानंतर अजून एक एक निळ्या कलरची पट्टी येईल त्यावर क्लिक करायचे आहे .इंटरफेस उघडेल त्यात तुम्हाला दोन्ही बॉक्स मध्ये तुमचा पॅनकार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर विचारला आहे त्यात मोबाईल नंबर टाकायचं आहे.आणि continue या बटनावर क्लिक करायचे आहे. 

मोबाईल वेरिफिकेशन 

त्यानंतर तुमच्या मोबाइलला वर एक OTP येईल.तो तुम्हाला व्यवस्थित तिथे असलेल्या डब्यांमध्ये टाकायचा आहे.आणि continue या बटनावर क्लिक करायचे आहे. OTP टाकताना व्यवस्थित काळजी घ्या कारण तीन वेळेस जर चुकीचा OTP टाकला तर तुम्हाला नवीन  OTP येत नाही. नंतर तुम्हाला वेबसाईट पुढे घेऊन जाईल.तुमचे वॅरिफिकेशन झाल्यानंतर महत्याचे काम तुम्हाला करायचे आहे.

नवीन इंटरफेस उघडल्यानंतर तुम्हाला भरपूर ओपशन आलेले दिसतील. ते सर्व ऑपशन मध्ये आपल्याला जायचं नाही. पहिला जो ऑपशन येतो Income Tax म्हणून त्याच्यावरच आपल्याला क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुम्हाला New  Payment म्हणून नवीन इंटरफेस उघडेल त्यात तुम्हाला Assessment Year हा ऑपशन येईल.त्यातला सर्वात वरील ऑपशन २०२४-२५ हा तुम्हाला निवडायचा आहे.त्यानंतर तुम्हाला विचारेल type of Payment. त्यावेळी त्या लिस्ट मध्ये बरेच ऑपशन असतील परंतु तुम्हाला निवडायचा आहे Other Receipts (500) हा ऑपशन. 

पेमेंट ऑपशन 

त्यानंतर अजून एक इंटरफेस उघडेल त्यात तुम्हाला दिसतील तुम्हाला १००० रु भरायचे आहेत. त्यापुढे continue वर क्लीक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑपशन येईल. त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकता जसे कि नेट बँकिंग, डेबीट कार्ड, किंवा UPI. त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन वर क्लिक करायचे आहे.व तुमचे पेमेंट करून घ्यायचे आहे. 

पेमेंट व्यवस्थित झाल्यानंतर मित्रहो, एक रिसिप्ट येईल ती तुम्हाला सांभाळून सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण पॅन कार्ड आधार ला लिंक मोबाईलवर लिंक करू शकतो. "Pan card link with aadhar on Mobile" तर मित्रांनो. पुढील ४ ते पाच दिवसाच्या आत तुमचे पॅनकार्ड आधार ला लिंक होऊन जाईल.


किती सोप्प होतं ना मित्रांनो. पुढेही अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मला फॉलो करू शकता. तसेच हि माहिती तुमच्या मित्र,नातेवाईक, शेजारीपाजारी सर्वांना share करा.आजचा टॉपिक  "Pan card link with aadhar on Mobile" हा होता हे तुम्हाला माहीतच आहे, अजून कोणत्या टॉपिक बद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास कॉमेंट मध्ये सांगा निश्चितच माहिती पुरवली जाईल. धन्यवाद.

Income Tax Department Website: https://www.incometax.gov.in/iec/foportal/

Click Here-Income Tax Department


No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!