Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

RTE २५% प्रवेशाची ऑनलाइन सोडत जाहीर

Online Lottery for RTI २५% Admission announced नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवस अगोदर तुम्ही तुमच्या पाल्याच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अध...

Online Lottery for RTI २५% Admission announced नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवस अगोदर तुम्ही तुमच्या पाल्याच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारानुसार म्हणजेच शिक्षण हक्क कायदा (TRE) नुसार २५% राखीव जागांसाठी अर्ज केला होता.व लॉटरी पद्धतीने तुमच्या पाल्याचा प्रवेश होणार होता. व बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्या लॉटरीच्या सोडतीची प्रतीक्षा करत असाल तर ती प्रतीक्षा आता संपली आहे.

RTE_ Admission 

RTE २५% प्रवेशाची ऑनलाइन सोडत जाहीर Online Lottery for RTI २५% Admission announced

बुधवार दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी आर.टी.ई. २५ % प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून लॉटरी ची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. सोडतीमध्ये पुणे जिल्ह्याने सर्वाधिक प्रवेशाचा विक्रम केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी प्रवेश निश्चती झाली.

आर.टी.ई. प्रवेशासाठी(Online Lottery for RTI २५% Admission) खासगी शाळांमध्ये राखीव २५% जागांसाठी  शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत लॉटरी ची सोडत जाहीर करण्यात आली. यावर्षी राज्यातील सुमारे ८ हजार ८२८ शाळांमधून  १ लाख १ हजार ९६९ एवढ्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी  आपल्या पाल्याच्या प्रवेश साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले होते.

प्रवेशाची प्रक्रिया 


शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ज्या पाल्याचे ऑनलाईन 'Online Lottery for RTI २५% Admission' सोडतीत नाव आले आहे त्यांच्या पालकाने आपली कागतपत्रे तयार करून ठेवावी जसे कि पाल्याचे जन्म प्रमाणपत्र, स्वतःचे जात प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला, इत्यादी. तसेच पाल्याचे पासपोर्ट साइज फोटो सुद्धा काढून ठेवा.

प्रवेशाची यादी


प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून "Online Lottery for RTI २५% Admission"आर.टी.ई. च्या वेबसाईट वर सर्व यादी दिली आहे. ज्या पाल्यांचे नाव ऑनलाईन सोडतीमध्ये आले आहेत व जे पात्र आहेत त्यांच्या पालकांना  दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल. 

प्रवेशाची यादी खाली :👉क्लिक करा👈

वेबसाईट :-https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/maintenance

अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करा. हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद 


  
No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!