Akher turiche Bhavahi Sthiravale...! नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगामातील कापूस भावाने ' Cotton Rate' शेतकऱ्यांचा जीव मेटातु...
Akher turiche Bhavahi Sthiravale...! नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगामातील कापूस भावाने ' Cotton Rate' शेतकऱ्यांचा जीव मेटातुकीला आणला असताना, खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीने हंगामाच्या आरंभी भाव खाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन, शेतकऱ्यांना तुरीकडून चांगल्या भावाची अपेक्षा होती. हंगामाच्या सुरवातीला ८,२०० रुपयावर गेले होते. काही बाजारपेठांमध्ये तर नऊ हजार रुपयांपर्यंत तुरीच्या दराने मजल गाठली होती.
Akher_turiche_bhavhi_sthiravale |
अखेर तुरीचे भावही स्थिरावले...!
दरम्यान तूर बाजार तेजीकडे वाटचाल करत असतांना केंद्र सरकारच्या आयात धोरणाने परत तुरीच्या बाजारभावात ब्रेक लावण्याचे काम केले. केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या बाजारभावात स्थिरता पाहायला मिळाली. ९ हजारावर जातील असे वाटणारे भाव आता मात्र आठ हजार रुपयावर स्थिर झाले आहेत.
हंगाम संपल्यानंतर पिकांच्या बाजारभावात सुधारणा होते. परंतु यावर्षी सोयाबीन, कापसासह तुरीचे भावही दबावात आहेत. तुरीच्या पिकावर यावर्षी रोगामुळे उत्पादनात घट आल्याने तुरीचे भाव दहा हजार पार होतील असा शेतकऱ्यांच्या अंदाज होता. यंदा तुरीच्या हंगामाला उशीर झाला असल्याने बाजारात दराची तेजी कायम होती. गत हंगामात शेवटी शेवटी तुरीने चांगलाच भाव खाल्ला होता. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीने अकरा हजाराचा टप्पा गाठला होता.त्यामुळे या हंगामातही शेतकरी बाजारभावावर लक्ष ठेऊन होते.
यावर्षी उत्पादनात घट असूनही मागील हंगामातील भाव अजून मिळाले नाहीत.अन्य पिकांपेक्षा तूर भाव खात असून शेतकऱ्यांना किंचित दिलासा देत आहे.
आयात धोरणामुळे दर स्थिर?
आयात धोरणामुळे दरावर परिणाम होऊन गेल्या महिन्यापासून तुरीचे भाव आठ हजारावर स्थिरावले आहेत. अधिक माहितीनुसार सरकार म्यानमार मधून ७,९५० रुपये दराने खरेदी करत आहे. तर आफ्रिकेमधून आयात होणाऱ्या तुरीला ५ हजार ९८० रुपये दर दिला जात आहे. याशिवाय तुरीच्या साठेबाजीवर निर्बंध असल्याने तुरीच्या दरावर परिणाम होत आहेत.
मे अखेर तेजीची शक्यता ?
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात म्यानमार, आफ्रिका या देशातून आयात केली असतांना सुद्धा, असेच साठेबाजीवर नियंत्रण आणूनही मे महिन्यानंतर भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. या हंगामात तुरीच्या उत्पादनात घट झालेली पाहायला मिळते.त्याकारणाने आयात करूनही भावात जास्त परिणाम न झाल्याचे दिसून येत आहे.उलटपक्षी दिवसाआड तुरीचा बाजारभाव तेजीतच राहिला. आता हंगाम संपला असे असले तरी शेतकऱ्यांकडे अजून बरीच तूर शिल्लक आहे. याची खरीददार व व्यापारी यांना सुद्धा जाणीव आहे. त्यामुळे तूर्तास बाजारभाव उसळण्याची शक्यता जरी नसली, तरी मे अखेरीस तुरीचा बाजार तेजीत राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
त्यामळे काही आवश्यकता नसेल तर शेतकऱ्यांनी तूर न विकलेलीच बरी. तसेच "Tur Bajarbhav"बाजाराचा योग्य अंदाज घेऊन शेतकऱ्याने निर्णय घ्यावा. हि नम्र विनंती. बाजार भाव कधी कमी जास्त होतात हे कुणाच्या हातात नसल्यामुळे बाजाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.धन्यवाद...!
शेती व शेतीसंबंधी माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 👉 क्लिक करा
शेती व शेतीसंबंधी माहितीसाठी टेलीग्राम ग्रुप वर जॉईन व्हा 👉 क्लिक करा
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!