इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेने डिजिटल बचत खात्याबाबत केली मोठी घोषणा..! India Post Payments Bank ne Digital Bachat Khatyababat Keli Mothi Ghos...
इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेने डिजिटल बचत खात्याबाबत केली मोठी घोषणा..!
India Post Payments Bank ne Digital Bachat Khatyababat Keli Mothi Ghoshna..!
Indian_post_payment_bank_saving_account |
India Post Payment Bank Digital Saving Account : ज्या व्यक्तीचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त आहे. ज्याच्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड आहे असा भारतातला कोणताही व्यक्ति IPPB चे डिजिटल सेविंग खाते पोस्टात जाऊन किंवा घरबसल्या काढू शकतो.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने आता मोठी घोषणा केली आहे. आता त्यांनी सर्व माध्यमातून नवीन डिजिटल सेविंग अकाऊंट काढणे आता तूर्तास थांबवले आहे. हे जरी थांबवले असले तरी IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे इतर जे दुसरे सेविंग खाते तुम्ही काढू शकता. जसे की रेगुलर सेविंग खाते, प्रीमियम सेविंग खाते, व बेसिक सेविंग खाते.
पोस्ट बँकेने प्रेस रिलीस करून ही माहिती दिली की गुरुवार दिनांक १८ /०५/२०२३ रोज पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक तूर्तास सर्व माध्यमातून नवीन डिजिटल खाते काढणे बंद करत आहे.असे जरी असले तरी ज्या लोकांनी अगोदर जर हे खाते काढले असेल तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही, कारण जुने डिजिटल खाते बंद होणार नाहीत. व त्या खात्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही.
IPPB Digital Saving Account
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे अकाऊंट हे तुम्ही कोठेही उघडू शकत होतात. कारण गूगल प्ले स्टोर वर या बँकेचे एप असून कोणतीही व्यक्ति जी १८ वर्ष पूर्ण केलेली आहे. ती आपल्या घरी बसून सुद्धा हे खाते काढू शकत होती. त्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची गरज होती. ते आता बंद करण्यात आले आहे.
बर्याच शेतकर्यांचे किसान सन्मान निधि चे पैसे या खात्यात थेट जमा होत होते. अशा शेतकर्यांना घाबरण्याची काही गरज नाही. त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधि ची रक्कम आपोआप खात्यात जमा होईल.
IPPB रेगुलर सेविंग अकाऊंट
पोस्टात बचत खाते काढायला बरेच जन उत्सुक असतात अशा व्यक्तींनी सदध्या पोस्टात चालू असलेले रेगुलर बचत खाते काढू शकता.
हेही वाचा : कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्टे : दहा लोकप्रिय वाण
पंजाबराव डख हवामान अंदाज २०२३: या दिवशी येईल मान्सून...!
व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 👉क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा 👉क्लिक करा
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!