Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

how to reduce face fat:effective tips चेहर्‍यावरची चरबी कशी कमी करायची

how to reduce face fat: effective tips  खानपानातील अनियमितता आणि बेशिस्त जीवनशैलीने मनुष्य आपल्या शरीराचे खूप नुकसान करून घेत आहे. त्यामुळे ...

how to reduce face fat: effective tips 

खानपानातील अनियमितता आणि बेशिस्त जीवनशैलीने मनुष्य आपल्या शरीराचे खूप नुकसान करून घेत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या तर निर्माण होतातच, आणि शरीर सुद्धा बेडोल दिसायला लागतं. बेशिस्त जीवनशैली ची जर एकदा सवय लागली तर संपूर्ण जीवनच अंधारमय होऊन जातं. समाजात वावरताना अनेकदा आपण आपल्याभोवती अनेक प्रकारची लोकं पाहतो. काहींचे शरीर हे सुडोल असतं, दिसायलाही ते रुबाबदार दिसतात. आपण लठ्ठ असलो तर अशा लोकांबद्दल मनात नेहमी हेवाच वाटतो. काही लोकांची चेहऱ्याची ठेवणंही अगदी सुरेख असते. 

how_to_reduce_face_fat


खानपानाच्या अनियमितेमुळे शरीर लठ्ठ व्हायला सुरुवात होते. चरबी शरीराच्या अनेक भागात साठायला सुरुवात होते. शरीरात चरबी पोटावर, कमरेवर जमा होतेच पण मानेत आणि चेहऱ्यावर सुद्धा जमा व्हायला सुरुवात होते. चेहऱ्यावरील चरबी खरंच चिंतेची बाब आहे. ती कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. काही बाबींकडे लक्ष दिले तर नक्कीच आपल्याला चेहऱ्यावरची चरबी कमी करता येते. ती कशी कमी करायची हे आपण आज पाहणार आहोत.

काही चांगल्या सवयी आहेत. नियमित पणे काही गोष्टींवर आपण लक्ष दिले तर नक्कीच आपण या त्रासापासून मुक्त होऊ शकू.

१) खूप पाणी पिणे 

पाणी पिणे किती महत्वाचे आहे हे काही वेगळे सांगायला नको..! पाणी दिसभरात नियमित पिले पाहिजे. त्यामुळे ताजेतवाने तर वाटतेच. तसेच पोटही नेहमी भरल्यासारखे वाटते. पाण्यात शून्य टक्के कॅलरीज असतात. त्यामुळे कितीही पाणी प्यायले तरी त्याने वजन वाढत नाही.

जेवणापूर्वी जर एक ग्लास पाणी आपण प्यायलो, तर आपले पोट भरलेले राहील त्यामुळे आपण जेवतांना कमी आहार घेऊ. कमी आहार घेतल्यामुळे शरीरात कमी कॅलरीज जातील. परिणामी वजन कमी व्हायला सुरुवात होईल.

२) संतुलित आहार 

भारतीय जेवणामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. भारतीय पदार्थ जसे गव्हाची पोळी, भात इ. भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. कर्बोदकांचे जास्त सेवन हे लठ्ठपणाचा धोका जास्त वाढवतो. त्यातच बाहेरील जंक फूड चे  जिभेचे चोचलेही लठ्ठपणाला खूप कारणीभूत आहेत. म्हणून त्यांचे सेवन खूप कमी केले पाहिजे. आणि प्रॉसेस पॅकिंग फूड तर अजिबात बंदच करायला पाहिजे.

नियमित दोन वेळ जर व्यवस्थित जेवण केले तर लठ्ठपणा कमी होतो हे आता बरेच अंशी संशोधनातून खरं होतंय. ड्रॉ. दीक्षित यांच्यासारख्या अनेक प्राध्यापकांनी ते आता सिद्ध केलेले आहे. आहारात प्रथिने, आणि फायबर चे प्रमाण वाढवून आपण लठ्ठपणाला आवर घालायला सुरुवात करू शकतो.

३) मिठाचा अतिरेक टाळा 

मिठाचा जेवणात जास्त वापर केल्याने रक्तदाबावर परिणाम होतो. मीठ हे शरीरातील पाणी खेचून घेते त्यामुळे शरीराच्या काही भागात चमका निघतात. त्यात चेहऱ्याचाही समावेश आहे. मिठाचा कमी वापर आपल्याला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यास मदद नक्कीच करेल.

४) नियमित व्यायाम 

संतुलित आहाराबरोबर नियमित व्यायाम केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास खूप मदद होते.नियमित व्यायामात धावणे, चालणे किंवा सायकल चालवणे, पोहणे असे प्रकार तुम्ही करू शकता. नुसतं तासभर चालले तरी सुद्धा लठ्ठपणा कमी होतो. कमरेचा घेर तर कमी होतोच पण मानेची आणि चेहऱ्याची चरबी सुद्धा कमी होण्यास मदद होते.


अशाप्रकारे आपण 'how to reduce face fat' करू शकतो.

 
No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!