Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

पंजाबराव डख हवामान अंदाज २०२३: या दिवशी येईल मान्सून...! Panjab Dakh Havaman Andaj 2023

Panjab Dakh Havaman Andaj 2023  नमस्कार शेतकरी मित्रांनो 'panjab dakh havaman andaj live' आपण घेऊन आलो आहोत. शेतकरी पंजाबराव डख  सा...

Panjab Dakh Havaman Andaj 2023 

नमस्कार शेतकरी मित्रांनो 'panjab dakh havaman andaj live' आपण घेऊन आलो आहोत. शेतकरी पंजाबराव डख  साहेबांच्या हवामान अंदाजा विषयी नेहमी उत्सुक असतात.त्यांचा अंदाज बऱ्याचअंशी खरा ठरतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे असते. यावर्षी सुद्धा ते दर महिन्याला हवामान अंदाज सांगत असतात. परंतु पावसाळा कधी सुरु होईल. हा अंदाज त्यांनी सांगितला आहे. त्याच बरोबर पेरणी कधी होतील याचाही अंदाज त्यांनी सांगितला आहे.

panjab_dakh_havaman_andaj_2023


Panjab Dakh Havaman Andaj 

पंजाबराव डख हवामान अंदाज 

यावर्षी पावसाचे वातावरण थोडे चिंतेचे आहे. कारण मार्च आणि एप्रिल महिन्यात पाऊसाने खूप धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळा वेळेवर राहील का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय. असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी २०२० चे उदाहरण दिले. ते म्हणाले २०२० साली सुद्धा एप्रिल महिन्यात ६० दिवस पाऊस पडला होता. तरी त्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.

कधी येतोय पावसाळा ?


पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार जून महिन्यात ८ तारखेला मान्सून केरळ मध्ये दाखल होईल. त्यानंतर महाराष्ट्रात साधारणतः १५ तारखेला मान्सून चे आगमन महाराष्ट्रात होईल.पहिल्या पंधरा दिवसातच शेततळे तुडुंब भरून वाहतील.असे त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण पावसाळा चांगला राहणार आहे.

पेरणी कधी होतील?

पंजाबराव डंख यांच्यामते जूनच्या  १५ तारखेला पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, १६ आणि १७ तारखेला चांगला पाऊस पडेल. परंतु मान्सून २२ जून नंतर स्थिर व्हायला सुरुवात होईल. २५ ते २८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पेरण्या होतील असा त्यांचा अंदाज आहे.काही राहिलेल्या पेरण्या जुलै च्या पहिल्या पंढरवाडयात होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.


जून महिन्यात जरी पाऊस कमी असला तरी जुलै, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर मध्ये चांगला पाऊस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर शेतकरी मित्रांनो. हा होता यावर्षी चा "panjab dakh havaman andaj live".यावर्षी चांगल्या पावसाची आपण सर्वजणच आतुरतेने वाट पाहतोय.चांगला पाऊस होवो हीच पार्थना. इतर शेतकऱ्यांना हा संदेश द्यायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद.

व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 👉क्लिक करा 
टेलिग्राम    ग्रुप वर जॉईन व्हा  👉क्लिक करा 



No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!