Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

PM Kisan Samman Nidhi New Registration Update

PM Kisan Samman Nidhi New Registration Update   नमो शेतकरी महासम्मान निधी नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्...

PM Kisan Samman Nidhi New Registration Update नमो शेतकरी महासम्मान निधी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 'प्रधान मंत्री सम्मान निधी' या वर्षाला सहा हजार रुपये रक्कम मिळणाऱ्या योजनेची सुरुवात केली होती.देशातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

namo_shetkari_mahasamman_nidhi


त्याच धर्तीवर महाराष्ट्रात श्री.देवेंद्र फडणवीस व  श्री.एकनाथराव शिंदे यांच्या महायुती सरकारनेही शेतकऱ्यांना हि "नमो शेतकरी महासम्मान निधी" योजना महाराष्ट्रात सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्राचे सहा हजार रुपये व राज्याचे सहा हजार रुपये  एकूण बारा हजार  रुपये वर्षाला मिळतील.

राज्य सरकार बनवतेय शेतकऱ्यांची यादी

२०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. महाराष्ट्रात सरकारने अर्थसंकल्पातील घोषणे प्रमाणे या योजने साठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असुन यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे. हि यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम रूप दिल्यानंतर तात्काळ नमो शेतकरी महासम्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

लाभार्त्यांच्या संख्येला कात्री...!

केंद्राच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून सुमारे एक कोटी पंधरा लाखाहून अधिक शेतकरी पात्र ठरले होते. परंतु करपात्र शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी व नोकरदार वर्ग असलेला शेतकरी ही या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यावर या यादीला कात्री लावण्याचे काम सुरु आहे.

लाभार्त्यांच्या संख्येबाबत कडक भूमिका घेत शेतकऱ्यांडून भूमिलेख खात्यात जमिनीची अद्यावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे यादी कागतपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले.या शाटणीत अनेक शेतकरी अपात्र ठरले. 

एक कोटी पंधरा लाखाहून अधिक असणारी हि संख्या जवळपास ८१ लाखांपर्यंत खाली आली. त्यामुळे आता हि अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकार कडे मागणी केल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नवीन अर्जदार हि यादीत समाविष्ट 

PM Kisan Samman Nidhi सुरु झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा त्यात समावेश नव्हता. काही शेतकऱ्यांनी कागतपत्रे वेळेवर दिली नाहीत किंवा मधल्या मध्ये गहाळ झाली अशा शेतकऱ्यांनी CSC Center वर किंवा स्वतः प्रधान मंत्री सम्मान निधी साठी नोंदणी केली होती.

बरेच दिवस होऊनही आपल्याला सम्मान निधी मिळत नाही म्हणून काही शेतकरी चिंतेत होते. नोंदणी केल्यानंतर ती  माहिती जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर बँकेद्वारे तपासली जाते त्यानंतरच ती नोंदणी मान्य केली जाते. 

काही नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमीन करुन तसेच मुलांच्या नावे जमीन करुन या योजनेचा फायदा घायचे ठरवले होते. परंतु राशन कार्ड च्या आधारे अशा शेतकऱ्यांची नोंदणी अमान्य करण्यात आली आहे. 

बरेच नवीन अर्जदार यांची नोंदणी यशस्वी झाली असून त्यांनी जवळच्या CSC  Center वर जाऊन चेक करून घ्यावे. किंवा मोबाईल मधेही तुम्हाला चेक करता येईल त्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार नंबर टाकल्यावर तुमच्या अर्जाची स्तिथी तुम्हाला दिसून येईल. 

ई- केवायसी केल्यावरच होईल अर्ज मंजुर

नवीन अर्जदारांचा वर सांगितल्या प्रमाणे जर अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला ई- केवायसी करणे गरजेचे आहे. ई- केवायसी केली नाही तर तुम्हाला प्रधान मंत्री सम्मान निधीनमो शेतकरी महासम्मान निधी या दोन्ही योजनांच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही. म्हणून तुम्ही जवळच्या CSC  Center वर जाऊन ई- केवायसी करून घ्या. त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असला पाहिजे.

मोबाईल वरूनही  होते ई- केवायसी

मोबाईल वरूनही ई- केवायसी करू शकता त्यासाठी लिंक मी खाली देत आहे. लिंक वर क्लिक करून तुम्हाला अगोदर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल वर एक चार अंकी OTP येईल तो OTP तुम्हाला त्यात चौकटीत टाकायचा आहे. 

pm_kisan_E_Kyc

त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार ला लिंक असलेला नंबर विचारण्यात येईल तो नंबर टाकावा. ज्या मोबाईल नंबर वर तुमचे आधार लिंक आहे त्यावर तुम्हाला अजून एक सहा अंकी OTP येईल तो तुम्हाला टाकायचा आहे. पुढे क्लिक केल्यावर your e-Kyc done Successfully..! हा मेसेज पेज वरच दिसेल. अशाप्रकारे तुमची  ई- केवायसी होऊन जाईल.

आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक 

 ई- केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा होईलच असे नाही. त्यासाठी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे का हे अगोदर तपासून घ्यावे. त्यासाठीची लिंक हि मी खाली देत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस जमा होईल सम्मान निधीचा हप्ता.


नोंदणी यशस्वी झाली का चेक करा : क्लिक 

मोबाईल वर ई- केवायसी करण्यासाठी: क्लिक 

आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का?: क्लिक 


धन्यवाद शेतकरी मित्रहो..! हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.





No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!