Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

RTE 25 % admission: तिसऱ्यांदा मुदतवाढ

 'आरटीई' प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ आरटीई RTE 25 % admission  प्रवेश प्रक्रिया सुरु असून, लकी ड्रा मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्...

 'आरटीई' प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

आरटीई RTE 25 % admission प्रवेश प्रक्रिया सुरु असून, लकी ड्रा मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी ८ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, या मुदतीतही प्रवेशप्रक्रिया पूर्ण न होऊ शकलेली नाही.

RTE_25%_admission


 दिलेल्या मुदतीत केवळ १९६५ जणांचे प्रवेश निश्‍चित झाले होते.त्यामुळे उर्वरित प्रवेश निश्‍चित करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उद्या सोमवार दि.१५ मे रोजी संपत असतांना आता पुन्हा तिसऱ्यांदा प्रतिसाद फारसा मिळत नसल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळे २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, "RTE 25 % admission" लकी ड्रा झाल्यापासून आता ही तिसऱ्यावेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

२२ मेपर्यंत करता येईल प्रवेश निश्‍चिती

तर पालकांचा ठराविक नामांकित शाळेतच प्रवेश मिळावा या अट्टाहासामुळे मिळालेल्या जागेवरही प्रवेश निश्‍चित न केल्याने अर्ध्याहून अधिक जागा अद्यापही रिक्त असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा. यासाठी खासगी शाळांमध्ये 'RTE 25 % admission' २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो.१७०४ जणांचे प्रवेश निश्‍चित यंदा छत्रपती संभाजीनगरसाठी आरटीई प्रवेश पात्र शाळांची एकूण संख्या ५४५ आहे. 

 हे पाल्य प्रवेश फेरीतून बाद होतील...!

प्रवेश क्षमता ४०६२ असून, यासाठी २० हजार ७७५ अर्ज आले आहेत. त्यापैकी ड्रॉ मध्ये ४०३५ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी रविवारी सायंकाळपर्यंत २३३१ जणांचे प्रवेश निश्‍चित झाले .अजूनही १७०४ जणांचे प्रवेश निश्‍चित होणे बाकी असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पात्र ठरूनही प्रवेश न घेतल्यास त्या पालकांचे पाल्य हे RTE 25 % admission प्रवेश फेरीतून बाद होतील. याची पालकांनी नोंद घ्यावी.

लवकरात लवकर करावा प्रवेश...!

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता फेब्रुवारी महिन्यात अर्ज प्रक्रिया शाळांसाठी सुरू करण्यात आली होती. तर पालकांसाठी मार्च मध्ये नोंदणी प्रक्रिया करण्यात आली आणि RTE 25 % admission प्रवेशासाठी  ड्रॉ  देखील करण्यात आला. १३ एप्रिल पासून पालकांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आरटीईच्या RTE 25 % admission पोर्टलवर येणार्‍या अडचणी पाहता ८ मेपर्यंत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना मुदत देण्यात आली होती. 

ही मुदत सोमवार दि. ८ मे रोजी संपली. परंतु या दिलेल्या मुदतीतही RTE 25 % admission प्रवेश पूर्ण न झाल्याने आता दुसऱ्यांदा मुदवाढ देण्यात आली होती. या नव्या तारखेनुसार १५ मे पर्यंत पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्‍चित करायचे होती. ही अंतिम मुदतवाढ असणार आहे.


No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!