Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये : दहा लोकप्रिय वाण

कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये : दहा लोकप्रिय वाण  नमस्कार शेतकरी मित्रांनो.तुमचे स्वागत आहे.मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी...

कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये : दहा लोकप्रिय वाण 



नमस्कार शेतकरी मित्रांनो.तुमचे स्वागत आहे.मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा लेख आज आपण घेऊन आलो आहोत यामध्ये २०२२ सालामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट कापूस वाण कोणते होते. अशा प्रकारची माहिती आपण  सविस्तर बघणार आहोत. ज्यामध्ये आपण २०२३ सालासाठी कापसाच्या कोणत्या जाती किंवा वाण योग्य राहतील हे आपण पाहणार आहोत.

top_ten_cotton_seeds_varieties
तुम्हाला मी अगोदरच सांगू इच्छितो कि कापसाच्या जातीचा कोणताही वाण असला तरी त्याची उत्पादकता हि आपल्या योग्य नियोजन, योग्य हवामान आणि योग्य जमिनीच्या निवडीवरच अवलंबुन असते.तुम्ही कोणतेही कापसाच्या जातीची निवड केली, आणि योग्य व्यवस्थापन केले नाही तर अशावेळी तुम्हाला उत्पादकता हि मिळणार नाही. तसेच शेतकऱ्यांना हेही माहित आहे कि हवामानाचा आपल्या पिकावर कसा परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या जमिनीचा पोत पाहूनच योग्य वाणाची निवड करावी.

दिलेल्या कापसाच्या जाती ह्या आपल्या परिसरात च्या चालतात किंवा आपल्याला ज्या जातींचा अनुभव आहे. त्या जाती लावण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. कुणाच्या सांगो सांगी अगदीच नवीन वाण लावू नये. कारण आपले पीक हे आपले मुख्य पीक असल्याने आपला बराच आर्थिक भार त्या कापसाच्या पिकावर अवलंबून असतो. अशा वेळी जर आपण चुकीचे बियाणे निवडले तर सगळे आर्थिक बजेट कोलमडून जाईल.त्यामुळे आपल्याला जे कापसाचे बियाणे घ्यायचे आहे ते लक्ष
पूर्वक निवडावे.

बनावट बियाण्यापासून सावधान

बियाणे घेताना आपल्या ओळखीच्या दुकानातूनच बियाणे खरेदी करावे. बी घेतल्यानंतर दुकानदाराकडून बियाण्याचे पक्के बिल घ्यायला विसरायचे नाही.त्यानंतर कापूस लागवड करतांना, लागवड करून झाल्यावर ज्या बियाण्याच्या रिकाम्या पिशव्या आहेत त्या उगवण होई पर्यंत सांभाळून ठेवाव्या.कारण मार्केट मध्ये असे काही लोक घुसले आहेत, जे आपले आवडत्या बियाण्याचे बनावट बियाणे करून बाजारात विकत आहेत. असे बियाणे जर आपल्याला मिळाले आणि आपले बियाणे उगवलेच नाही, किंवा कमी उगवले अशा वेळी आपण आपल्याकडे जर पक्के बिल असेल तर त्या दुकानदाराची आपण तक्रार करू शकतो.अशा वेळी आपल्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते.

चला तर मग पाहूया कापसाच्या शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेल्या जाती.

१)मनी मेकर KCH-100 BG II(कावेरी सीड्स) 

cotton_seeds_money_maker
 

नंबर एक वर असलेले कावेरी सीड्सचे मनी मेकर. हे वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय असून या कापसाच्या वाणाचा कालावधी १५५ ते १६० दिवसाचा आहे. या वाणाची लागवड मे आणि जूनमध्ये आपण करू शकतो. सिंचनाचा विचार करायचा असेल तर कोरडवाहू आणि बागायत अशा दोन्ही पद्धतीमध्ये त्याची लागवड करता येते. आणि उत्पादनाचा  विचार करायचा झाला तर एकरी आठ क्विंटल ते १४ क्विंटल पर्यंत या वाणाचा शेतकऱ्यांना रिजल्ट आला आहे. या वाणाची लागवड विदर्भ, मराठवाडा व खान्देश व इतर ठिकाणी करू शकता.

२) मोक्ष KCH-15K39 BGII (आदित्य सीड्स)

cotton_seeds_moksha

त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा आदित्य कंपनीचं मोक्ष हे वाण. या वाणाचा बोण्ड हे मोठ्या आकाराचे असते.अतिशय लोकप्रिय वाण असून मराठवाडा आणि विदर्भात आणि खान्देशात  सुद्धा या वाणाची लागवड केली जाते. या वाणाची लागवड मे व जून महिन्यात करावी.पिकाचा कालावधी बघा १४५ ते १६० दिवस आहे. लागवड सिंचनाचा विचार करतांना कोरडवाहू आणि बागायती अशा दोन शेतामध्ये याची लागवड करतात. उत्पादनाचा विचार करायचा झालं तर एकरी आठ ते १२ क्विंटल पर्यंत अवरेज याचा आलेला आहे.


३)धनदेव प्लस MRC73 73 BG II(मायको सीड्स)

यानंतर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर ठेवलेला वाण आहे. मायको  कंपनीचे धनदेव प्लस हे अतिशय लोकप्रिय कापूस

cotton_seeds_dhandev_plus

 वाण आहे. पिकाचा कालावधी बघा १४० दिवसाचा असून लवकर येणार वाण आहे.याची लागवड मे आणि जूनमध्ये  करता येते. आणि बागायती शेतीमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.यासाठी चांगल्या व मध्यम जमिनीत याची लागवड केलेली चालते. उत्पादनाचा विचार करायचा तर एकरी आठ ते बारा क्विंटल पर्यंत अवरेज याचा आलेला आहे.

३) तुलसी ले पंगा TULASI-118 BG II (तुलसी सीड्स) 

cotton_seeds_tulasi_le_panga


नंतरचे वाण आहे मित्रांनो  ले पंगा तुळशी कंपनीचे हे वाण  असून अतिशय लोकप्रिय वाण आहे. याचा कालावधी

१५० ते १६० दिवसांचा असून मे आणि जूनमध्ये याची लागवड करता येते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रामध्ये याची लागवड करता येते. उत्पादनाचा विचार करायचा झालं तर एकवी आठ ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन या वनापासून मिळत असते. 

4) जंगी MRC 7017 plus BG II (मायको सीड्स)

cotton_seeds_jungee

अतिशय लोकप्रिय व नाही मित्रांनो त्यानंतर चवथ्या क्रमांकावर ठेवलेला आहे बघा आपण महिको कंपनीचं जंगी हेवान अतिशय लोकप्रिय कंपनी आहे मिळतो कालावधी बघा 150 ते 160 दिवसाचा असून मी आणि जूनमध्ये याची लागवड करता येते कोरोना आणि बागायती अशा दोन्ही शेतामध्ये याची लागवड करता येते आणि उत्पादनाचा विचार करायचा झालं तर एकरी आठ ते बारा क्विंटल पर्यंत सरासरी उत्पन्न या मनापासून आपल्याला मिळत असतील 

 

हेही वाचा : पंजाबराव डख साहेबांचा नवीन हवामान अंदाज 


5)भक्ती NCS 245 BG II (निजूविदू सीड्स)

cotton_seeds_bhakti


त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे निजूविदू सीड्स कंपनीचे भक्ती हे वाण अतिशय निजूविदू सीड्स हि अतिशय लोकप्रिय  तामिळनाडूची कंपनी आहे.त्याचा कालावधी १४५ ते १६० दिवसांचा असून मे  आणि जूनमध्ये या वाणाची  लागवड करता येते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रातील लागवड करता येते. आणि उत्पादनाचा विचार करायचा असेल तर एकरी आठ ते 13 क्विंटल  पर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी यापासून घेतलेले आहे.

६)सुपरकॉट PCH-115 BT-2 (प्रभात सीड्स ) 

cotton_seeds_supercot

 तर मित्रांनो पाचव्या क्रमांकावर आपण ठेवलेला आहे प्रभात सीड्स चे सुपरकॉट हे वाण. हेही वाण शेतकर्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या वाणाचे बोण्ड मोठे असुन हि रस शोषक किडीला आवर घालणारी आहे. हि जात आपण कोरडवाहू व बागायती या दोन्ही पद्धतीत लागवड करू शकतो.

 पीसीएस 115 या जातीत झाडाची वाढ डेरेदार होते.  रोगप्रतिकार शक्ती  चांगली  आणि लाल्या रोगाचा प्रभाव सुद्धा या वानावरती अतिशय कमी प्रमाणावर आढळून येतो अतिशय लोकप्रिय असून मित्रांनो या वनाची माहिती जर सांगायची झाली तर पिकाचा कालावधी १६० ते १७० दिवसाचा आहे. मध्यम आणि भारी जमिनीत या वाणाची  लागवड करता येते. उत्पादनाचा विचार करायचा झालं तर एकरी आठ ते 14 पर्यंत आवरेज या वाणापासून  आपल्याला मिळत आहे.

७)अजित १५५  AJEET 155 BG II (अजित सीड्स)

cotton_seeds_ajeet_155

त्यानंतर मित्रांनो सातव्या क्रमांकावर आहे अजित १५५, हे वाण विदर्भात खूपच लोकप्रिय आहे.पाण्याचा ताण सहन करणारे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि लाल्या रोगाचा प्रतिबंध या वाणावरती कमी आढळून  येत असतो अतिशय लोकप्रिय वाण आहे.

 या वाणाची वैशिष्ट्ये सांगायचं झालं तर कालावधी १४५ ते १६० दिवसांचा असून बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही शेतामध्ये ची लागवड करता येते मे  आणि जून मध्ये याची पेरणी आपण सहज पणे करू शकतो आणि उत्पादनाचा विचार करायचा झाला तर मित्रांनो एकरी यापासून आपल्याला साधारणपणे आठ ते 14 क्विंटल पर्यंत आवरेज कापसाचे मिळालेला आहे. 

पण अशी शेतकऱ्यांच्या मनात थोडीशी शंका आहे कारण हे झाड तोडे नाजूक असते कापूस कमी होतो आणि बोण्ड सुद्धा किडके होण्याची शक्यता असते असे काही शेतकऱ्यांना वाटते.

८)अंकुर हरीश  ANKUR 216 BG II ( अंकुर सीड्स )

cotton_seeds_ankur_harish


अतिशय लोकप्रिय असून मोठे बोंड आहे.वेचनीसाठी सोपे आणि रस शोषक किडीचा प्रतिबंध करण्यासाठी हे वाण अतिशय योग्य आहे त्या पिकाचा कालावधी १३०ते १५० दिवसाच्या असून हंगाम बघायचं झालं तर मे आणि जून मध्ये या वाणाची लागवड करता येते कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याची लागवड करता येते एकरी आठ ते 14 क्विंटर पर्यंत आवरेज या वाणापासून मिळू शकतो. वेसण्यास सोपा कापूस असतो आणि बोंडांचा आकार सुद्धा मित्रांनो मोठा असतो अतिशय सुंदर आणि लोकप्रिय वाण आहे.


९) यु एस 70 67 SWCH 4749 BG II (यु एस अग्रीसीड्स)

Cotton_seeds_us_agrisseds_7067


 त्यानंतर मित्रांनो नंतरचे वाण आहे यूएस अग्रोसिड्स कंपनीचे यु एस 70 67 हे वाण. ते डेरेदार झाड या वाण्याची वैशिष्ट्य असून,अजून  वैशिष्ट्याचा विचार करायला झालं तर या वाण्याचा पिकाचा कालावधी आहे मित्रांनो १५५ ते  १६० दिवसाचा. त्यानंतर बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही शेतामध्ये याची लागवड करता येते. साधारणपणे 15 मे नंतर आणि जून मध्ये याची लागवड करता येते. आणि उत्पादनाचा विचार करत आले तर नऊ ते पंधरा क्विंटल पर्यंत आवरेज त्या वाण पासून आपल्याला आलेला आहे. अशा खूप सार्‍या कमेंट आपल्याला शेतकऱ्यांनी पाठवलेले आहेत.

१०) राशी आरसीएस ६५९ RASI RCH 659 BG II ( रासी सीड्स )

cotton_seeds_rashi_rch_659

आणि मित्रांनो क्रमांक एक वरती आहे राशी कंपनीचे आरसीएस ६५९ अतिशय लोकप्रिय व नसून या पानाचा कालावधी बघा 155 ते 160 दिवसांचा असून सिंचनाचा प्रकार बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही शेतामध्ये ची लागवड करता येते. मे आणि जून महिन्यात लागवड करून, लवकर उत्पादन घेऊन दुसरे पीक सुद्धा खूप सारे शेतकरी आता घेत आहेत. उत्पादनाचा विचार करायचा तर एकरी नऊ ते 14 क्विंटल पर्यंत आवरेज खूप साऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.

तर अशाप्रकारे आपण लोकप्रिय कापसाचे वाण पहिले. "Top Ten Popular Cotton varieties: and their Characteristics" शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत पाहूनच वाणाची निवड करावी.आपल्या अनुभवानुसार जे वाण आपल्याला चांगले वाटते तेच पेरावे. कोणत्याही फसव्या जाहिरातीला बळी पडू नये.

शेतकऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी माझा मोबाईल नंबर ९५६११५३३९१ हा आपल्या वॉट्सअप ग्रुप मध्ये सामील करून घ्यावा. व हि माहिती अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी हि नम्र विनंती.

व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा : क्लिक  

टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा :क्लिक 



No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!