Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

पेरणीपूर्व सोयाबीन लागवड टिप्स : महत्वपूर्ण माहिती थोडक्यात

पेरणीपूर्व सोयाबीन लागवड टिप्स :  महत्वपूर्ण माहिती थोडक्यात  Soybean Planting Tips Before Sowing:Important Information in Brief soyben_lagw...

पेरणीपूर्व सोयाबीन लागवड टिप्स :  महत्वपूर्ण माहिती थोडक्यात 
Soybean Planting Tips Before Sowing:Important Information in Brief


soyben_lagwad

नमस्कार शेतकरी बांधवांनो,मशागत झाली असेल आणि शेतात काय पेरायचे हेही ठरले असेल. सोयाबीन पेरत असाल तर हा लेख नक्की वाचा यात आपण पेरणीपूर्वी सोयाबीन लागवडीच्या महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत.काही महत्वाच्या टिप्स आहेत त्याने तुमची गडबड होणार नाही.

उगवण शक्ती तपासणे

आता सोयाबीनमध्ये काय काय महत्वाचं आहे तर उगवण शक्ती. घरच्या घरी उगवण शक्ती तपासणी होऊ शकते, तुम्ही तपासू शकता. आपलं गोणपाट असतं त्याचे एक बाय दीड चे तुकडे करायचे. ते तुकडे  पाण्यात ओले करायचे आणि त्याच्यावर दहा दहा बियांच्या दहा लाईन म्हणजेच१०० बिया ठेवाव्या.  तुम्हाला शंभर बिया त्या उगवण शक्तीसाठी घ्याव्या  लागतील. कमी बिया घेतल्या तर आपल्याला  तसा रिजल्ट मिळणार नाही.  सकाळ संध्याकाळ त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि नंतर मग पाचव्या दिवशी त्याला उचलायचं. सहाव्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी आणि ज्याची वाढ चांगली झालेली आहे मूळ चांगले वाढलेले शूट सूट दोन्ही चांगले वाढलेले, ज्याला बुरशी नाही जे खराब झालेलं नाही, असं बियाणं म्हणजे हे उत्कृष्ट बियाणे. 

त्या शंभर पैकी जेवढे दाणे चांगले आहेत चांगले उगवलेले आहेत तेवढे टक्के जर्मिनेशन आपण असं म्हणू शकतो. जर तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशीच पहिला नुसतं कोम आलेला दिसेल पण ते बियाणं जमिनीत गेल्यानंतर किती चांगल्या प्रकारे तग धरू शकतो ते समजत नाही.त्यामुळे पाचवा किंवा सहावा दिवस आपल्याला ते बियाणे  गोणपाट मध्ये ठेवावे लागेल ,कारण सोयाबीन बियांचे टरफल हे फार नाजूक असतं . 

सोयाबीनचे योग्य वाण व वैशिष्ट्ये 

यांच्यामध्ये आपण तीन प्रकार ती इथे सांगतोय उभाट वाढणाऱ्या जाती ,मध्यम फांद्या करणारी जाती, आणि फांद्या करणाऱ्या जाती. 

१)उभाट वाढणाऱ्या जाती

उभाट वाढणाऱ्या जाती मध्ये  जे एस ९३०५ (JS-9305) आहे,जे एस (JS-95 60) आहे, एम ए यू एस १६२ (MAUS-162) आहे आणि बूस्टर ८८ ८८ म्हणजे इचे  नाव सही आहे हे यावर्षीच बाजारात येणार पण इथं बियाणं काही फारसे जास्त उपलब्ध नाही. मशीन कटिंग साठी मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी चांगली जात आहे त्याच्या उभाट वाढणाऱ्या जाती आहेत अशा जातीला जास्त फांद्या नसतात त्यामुळे त्याच्या झाडाची संख्या जास्त असली पाहिजे आणि झाडाचे संख्येत जास्त असण्यासाठी एकरी बियाण्याचा प्रमाण इथे जास्त असलं पाहिजे तर या जातीसाठी बियाणं तुम्ही 30 ते 35 किलो घेऊ शकता.

२)मध्यम फांदी असणाऱ्या जाती 

त्यानंतर मध्यम फांदी असणाऱ्या जाती आहेत यामध्ये जेएस३३५ (JS-335) आहे,एम ए यू एस ६१२ (MAUS -612) आहे, डी एस २२८(DS-228) आहे, बुस्टर ८३३५ (Booster 8335) एक नवीन संशोधित जात आहे जिच्यामध्ये मध्यम फांद्या आणि उत्पादन क्षमता खूप चांगली आहे. हे बियाणे एकरी  25 ते 30 किलो साधारणतः 25 किलो जरी तुम्ही पेरला तरी चालेल 25 ते 30 किलो 30 किलो पेक्षा जास्त नको. 25 ते 30 किलोच्या मध्ये बियान्याचे प्रमाण आहे. हे मध्यम फांद्या करणार्‍या जातीचं.

३)जास्त फांद्या करणाऱ्या जाती

 जास्त फांद्या करणाऱ्या जाती आहेत त्यात केडीएस 727 (KDS 727) फुले संगम, त्यानंतर केडीएस 753(KDS 753) आहे फुले किमया, त्यानंतर के डी एस 992(KDS-992) फुले दूर्वा आणि बूस्टर 77 77 जीया, ह्या जाती खूप फांद्या करतात त्यामुळे याचा साधारणता २० किलो बियाणं पेरणी केली तर 20 ते 22 किलो बियाणं लागेल आणि लागवड जर केली तर मात्र मग तुमचं १२ किलो ते १५ किलो सुद्धा बियाणं तुम्ही पेरू शकता. 

यामध्ये गणित असं आहे की ज्या फांद्या करणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये विरळ पेरणी करायची झाडाची संख्या तिथे कमी असली पाहिजे, म्हणजे फांद्याची संख्या वाढुन  झाडाची संख्या तुम्हाला पेरल्यानंतर थोडं पातळ वाटलं, तुमचे मन लागणार नाही कसतरी वाटेल चिंता करू नका ते पातळ झालं तर तेवढ्या फांद्या जास्त करेल.व भरपूर उत्पादन होईल.

 इथे या उभट वाटणाऱ्या जाती आहेत या उभाट वाढणाऱ्या जातीमध्ये झाडांची संख्या वाढवायची म्हणजे आपलं उत्पादन तिथे वाढणार तर हे झालं सोयाबीनच्या वाढीनुसार जाती. त्याच्यानुसार एकरी बियाणे किती वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं. 

उभाट वाढणाऱ्या जाती मध्यम फांद्या करणाऱ्या जाती फांद्या करणाऱ्या जाती
JS 9305 Js 335 KDS 726
Js9560 MAUS 612 KDS 753
MAUS 162 Js 228 KDS 992
Booster 8888 Booster 8335 Booster 7777
एकरी बियाणे :३० ते ३५ किलो एकरी बियाणे २५ ते ३० किलो एकरी बियाणे २० किलो

सोयाबीन बीज प्रक्रिया (Soybean Seed Treatment)


त्यानंतर बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सोयाबीनला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरायचं नाही. तर बीज प्रक्रिया का करायची तर आपल्याला  सोयाबीनमध्ये सुरुवातीला जे रोग येतात त्याच्यावर आळा घालण्यासाठी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तर त्यांच्यासाठी रिहांश (थायमोक्झॉन ३५ एफ एस) चार मिली प्रति किलो, मुळांची  चांगली वाढ व्हावी यासाठी रायझर (किंवा चालल्या गुणवत्तेचे ह्यूमिक ऍसिड) चार मिली प्रति किलो ,आणि बॅग मधलं थायरम किंवा तुमचा घरचा बियाणं असेल तर मग बाजारातलं विटा वॅक्स हे सगळे तिन्ही औषधे एकत्र करून बियाण्याला चोळावी.

याच्यामुळे तुमचं कीड नियंत्रण म्हणजे खोडमासी, खोडकिडयाचे नियंत्रण होईल बुरशीच नियंत्रण म्हणजेच सुरुवातीला जे बियाणेद्वारे बुरशी पसरते तिचे  नियंत्रण होईल,आणि सुरुवातीची वाढ जोमदार होईल.रायझर चार मिली आणि बॅग मधलं फायरम किंवा विटाव्यक्स तीन ग्राम प्रत्येक किलो असं आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे.

 कोणतेही महागडे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरू नका त्यामुळे फारसा फायदा होत नाही या औषधांमुळे जेवढा फायदा होईल तेवढे त्या महागड्या एकरी पाचशे सहाशे रुपये एकरी खर्च लागणारे बरेचसे औषध बाजारात आहे, तर त्याच्या ऐवजी तुम्हाला खूप स्वस्तात ही सीड ट्रीटमेंट आहे ही नक्की करा ते म्हणजे बियाण्याचं लसीकरण आहे. लहानपणी जे आपण बाळाला प्लस देतो तसाच बियाण्याचं लसीकरण याला आपण म्हणू शकतो. 

तर या पद्धतीने सीड ट्रीटमेंट करा तुम्ही किलोला चार मिली असं, ते रायझर, रियांश आणि थायरम हे सगळं एकत्र मिक्स केले आपण एकत्र मिसळून घेतलं आणि ते बियाण्यावर एकदम न टाकता  पसरून टाकायचं जेणे करून एका ठिकाणी पडणार नाही जर एकाच ठिकाणी ते मिश्रण टाकले तर बियाणं फुगू शकतो त्याचे एम्ब्रोईड नाजूक असल्याने तो फुगू शकतो व बियाणे खराब होऊ शकते. त्यामुळे मिश्रण पातळ पद्धतीने बियाण्यावर शिंपडावे व  लगेच त्याला चोळून घ्यायचं आणि सावलीत त्याला दोन तास तीन तास सुकू द्यायचं.

हे तुम्ही बीज प्रक्रिया आताही करून ठेवू शकता, पेरणीच्या दिवशी खूप घाई होते तर तुम्ही लवकर जरी बीजप्रक्रिया करून ठेवली तरी हरकत नाही आणि हे सगळे औषध एकत्र करून बीज प्रक्रिया करायची हे सगळ्यात कमी खर्चाचं आणि सगळ्यात फायद्याची बीज प्रक्रिया आहे. पेरणीपूर्वी आठ दिवस आधी १५ दिवस आधी, म्हणजे आता जरी तुम्ही बीज प्रक्रिया करून ठेवली, आता पुढच्या आठ दहा दिवसात पेरणी होणारच आहे असं समजून त्याला सीड ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला सुकवा, चांगलं सुकल्यानंतर मग बॅगमध्ये भरा आणि नंतर मग पेरणी करा.

सोयाबीन लागवडीचे योग्य अंतर 


आता फांद्या करणाऱ्या जातींमध्ये अंतर जे आपल्याला घ्यायचे आहे हे सरीतले अंतर हे दोन ते अडीच फूट ठेऊ शकता.तर दोन झाडातला अंतर हे १० ते १५ सेंटीमीटर ठेऊ शकता. तुम्हाला जर काही शेतकरी पेरणीच्या ऐवजी सरी वरंब्यावर किंवा बेडवर लागवड करायची म्हणतात त्यांच्यासाठी या ज्या केडीएसच्या जाती आहेत केडीएस ७२६ केडीएस 753 किंवा 992 या जाती या बेडवर लागवडीसाठी किंवा सरीवर हे उत्कृष्ट आहे.

आणि जमिनीप्रमाने अंतर ठेवायचे असल्यास ,आपण हलकी मध्यम आणि भारी आणि खूप भारी या पद्धतीने आणि याच्याप्रमाणे दोन ओळीतला अंतर किती ठेवायचं हे पाहू.हलक्या जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर मध्यम जमिनीतून, वाढणारी जात असेल तर  १५ इंच ३० सेंटीमीटर, मध्यम जमिनीत मध्यम फांद्या करणारी ४५ ते २८ सेमी आणि मध्यम जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर २१ इंच अंतर ठेवा.

भारी जमिनीत उभाट वाढणारी असेल तर१८ इंच भारी जमिनीत मध्यम फांद्या करणारी असेल तर 21 इंच भारी जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर 24 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही अंतर ठेवू शकता म्हणजे दोन फुटाचे सुद्धा असावा ठेवू शकता आणि खूप भारी जमीन असेल आणि सरी वरंबा किंवा बेडवर लागवड करत असाल तर अडीच फुटाचा सुद्धा तुम्ही शकता जेणेकरून फांद्या करायला करणाऱ्या जातींना जास्त जागा मिळाली तर जास्त फांद्यावरून उत्पादन वाढेल.

त्या फांद्या जास्त करतात आणि लागवड केली तर बियाणं कमी लागून त्यांना उतारा खूप चांगला येतो तर साधारणतः दीड ते अडीच फुटाचा तुम्ही दोन सऱ्यांना अंतर ठेवू शकता आणि दोन बियात नंतर हे दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवू शकता. लागवड करायची असेल ते मशीन येतात हाताने लोटायचे त्यांने लावा किंवा एका जागी दोन दोन तीन बिया मजूर लावून टोपून घ्या.

पेरणी कशी करावी 


75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका जमीन थंड होणे गरजेचे आहे तीन ते पाच सेंटीमीटर खोल पेरणी करा. जास्त खोल नको एकदम त्याच्यावर मातीचा थोडासा थर असावा जास्त खोल जर पेरणी केली सोयाबीनच्या टरफल नाजूक असतं आणि उगवण शक्ती वर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जास्त खोल पेरणी करू नका. 

प्रशिक्षित ड्रायव्हर असावा, पेरणी करणारा जो ड्रायव्हर आहे हा प्रशिक्षित असावा .आणि उतारा ला आडवी पेरणी करणं गरजेचं आहे. बीबीएफ पद्धतीने पेरणी करा.यावर्षी तर बीबीएफ पद्धतीने पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उताराला आडवी पेरणी करवी,त्यांचे महत्त्व आहे ,याचं कारण हे जास्त पाऊस पडला तर सरीतून पाणी वाहुन जाईल आणि कमी पाऊस पडला तर सरीमध्ये पाणी मुरून जाईल ,म्हणजे जास्त पाऊस पडला तरी फायदा कमी पाऊस पडला तरी फायदा,अशा प्रकारे  पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ होते. आणि फवारणी सिंचनास मोकळी जागा, आणि २०% बियाण्यास बचत होते एवढे सगळे फायदे या पद्धतीने आहेत.

अशा प्रकारे पेरणीपूर्वी लहान-लहान गोष्टी कडे लक्ष देऊन आपण आपले सोयाबीनचे उत्पादन वाढवू शकतो. 
माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना शेअर करा हि विंनती.

No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!