Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

Mahadbt Farmer Tractor Subsidy schemes in maharashtra 2023

Mahadbt Farmer Tractor Subsidy schemes in maharashtra 2023  महाडीबीटी शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ नमस्कार सर्व शेतकरी बांधव...

Mahadbt Farmer Tractor Subsidy schemes in maharashtra 2023 
महाडीबीटी शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३

नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो.शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती मी घेऊन आलोय ज्याचा तुम्हाला खूपच फायदा होणार आहे.महत्वाची बातमी आली आहे,ती अशी कि "महाराष्ट्रात २५ हजार शेतकरी होणार ट्रॅक्टर धारक..!" महाराष्ट्र शासन 'शासन आपल्या दारी' अभियान महाराष्ट्रात राबवत असून त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. महाडीबीटी मध्ये ट्रॅक्टर ला अर्ज करून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता. 
Mahadbt_tractor_subsidy_scheme_2023

तो अर्ज कसा करायचा? महाडीबीटी ट्रॅक्टर योजना काय आहे ?अर्ज करायला कोणती कागदपत्रे पाहिजेत असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर अजिबात घाबरू नका संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे.हा लेख वाचल्यावर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील.

अर्जाची लिंक खाली दिली आहे

राज्यातील शेती मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.यासाठी आतापर्यंत तब्बल १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केला आहे. मात्र शासनाकडे निधी कमी असल्याने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. ट्रॅक्टर कोणाला द्यायचा याची निवड लॉटरी पद्धतीने होणार असून ती खूपच पारदर्शक असते.

हा अर्ज भरायला जास्त खर्च हि येत नाही. व एखादा अर्ज केल्यानंतर निवड होईपर्यंत तो अर्ज बाद होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी हा अर्ज भरावा लागत नाही.

महाराष्ट्र राज्याच्या कृषि यंत्रे अनुदान योजना  
Subsidy Schemes For Farmers in Maharashtra 


ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून .या योजने मध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.  या योजने मध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान 'MAHABDT FARMER SUBSIDY' अंतर्गत दिले जाते. 

उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे उदा.रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(८ एच पी पेक्षा कमी व ८ एच पी पेक्षा जास्त ) ,ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,

अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो तो तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटर वर जाऊन करू शकता किंवा स्वतःही अर्ज करू शकता अर्जाची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे.

ट्रॅक्टर योजनेमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या ट्रॅक्टर साठी अर्ज करता येतो १) डब्लू डी  आणि २) ४ डब्लू डी अशा दोन प्रकारात ८ एच पी ते ७० एच पी च्या ट्रॅक्टर साठी अर्ज करता येतो.१) डब्लू डी ट्रॅक्टर ची दोन चाके हि इंजिनाला जोडलेली असतात व त्यांच्यातच ताकद असते तर २) ४ डब्लू डी ट्रॅक्टर मध्ये चारही चाकांना ताकद दिलेली असते त्यामुळे अशे ट्रॅक्टर अवजड कामातही मागे येत नाहीत.

महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेसाठी अनुदान किती मिळते 
Subsidy For Tractor Scheme in Maharashtra 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करून जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला पूर्व संमती पत्र मिळेल त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावर अनुदान मिळणार आहे. ते असे  शासनाच्या  माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखाची आणि मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक, दिव्यांग, महिला शेतकऱ्यांना सव्वा लाख (एक लाख पंचवीस हजार रुपये) सबसिडी च्या माध्यमातून दिले जातात. बाकी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला हप्त्याने द्यावयाची आहे.

महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेसाठी कागदपत्रे


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी  पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागतात.
  • अर्जदाराचा स्वतःचा आद्यावयात ७/१२ उतारा 
  • अर्जदाराच्या जमिनीचा नमुना -८ अ चा उतारा 
  • जातीचा दाखला (अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास )
  • आधार कार्ड 
  • बँकेचे पासबुकाची कॉपी 
  • जवळ मोबाईल असणे आवश्यक आहे.
  • पूर्व संमती मिळाल्यानंतर हमी पत्र 
  • व मान्यताप्राप्त संस्थेने दिलेले कोटेशन व तपासणी अहवाल (ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला देईल )

महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा.


या योजेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटर वर जाऊन करावयाचा आहे.तुम्हाला जर स्वतः अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या संगणकातून, लॅपटॉप मधून किंवा मोबाईल मधूनही करू शकता. त्यासाठी मी खाली लिंक देत आहे. ती लिंक उघडल्यानंतर तुम्हाला अगोदर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करून एक फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये जशी माहिती विचारली तशी भरून द्यावी.

त्यासाठी अगोदर तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी टाकायचा आहे व पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.त्यानंतर तुमची ई-मेल आयडी टाकून ई-मेल वरचा OTP टाकून सत्यता पडताळून द्यायची आहे. त्याचप्रमाणे मोबाईल ची हि सत्यता पडताळली जाईल. 

नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायला सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमचे आधाराला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही स्वतः अर्ज भरू शकता नाहीतर तुम्ही जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या.

त्यानंतर तुमची प्रोफाईल तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यात तुमच्या जमिनीचा तपशील, तुमचा पत्ता, तुमच्या बँकेचा तपशील विचारले जाईल. ती सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज करा या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यात कृषीयंत्राच्या चौकटीत क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज सादर केल्यानंतर शासनाकडून अर्जाची नाममात्र फी आकारली जाईल ती फी भरून निर्धास्त राहा आणि आपली निवड होण्याची वाट पहा.

तर अश्याप्रकारे महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेसाठीची संपूर्ण माहिती आपण आज दिली आहे. काही प्रश्न असल्यास मी खाली वॉट्सअप ग्रुप ची व टेलिग्राम ग्रुप ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करीन. हि माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.











No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!