Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

PM kisan 14th Installment date 2023: beneficiary list Direct Link

PM  kisan 14th Installment date 2023: beneficiary list Direct Link नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रधान मंत्री किसान सन्...

PM  kisan 14th Installment date 2023: beneficiary list Direct Link

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रधान मंत्री किसान सन्मान निधीची वाट पाहत असाल आणि अजूनपर्यंत १४ वि किस्त आपल्याला का मिळाली नाही हा प्रश्न तुम्हला पडला असेल तर मी त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतोय.जमिनीच्या मशागतीची तयारी चालू असेलच. वरुण राजाची आपण सगळे जण आतुरतेने वाट पाहतोय.नव्या हंगामाची नवी स्वप्ने, नव्या आशा,नवा जोश,अगदी नशिबाशीस आपण स्पर्धा करायला निघालोय; नाही का ? नवीन आशा मनात घेऊन कि या वर्षी तरी आपल्या मागची  पीडा टळेल.

PM-Kisan_samman_nidhi_2023


बियाण्यांच्या खरेदीची, खतांच्या खरेदीचीही लगबग सुरु असेल. त्यातच हवामान सांगणारे तज्ञ मंडळी सुद्धा रोज नवनवीन हवामान सांगून आपली मजा पाहतायत. कधी सांगतात चांगला पाऊस होणार, कधी सांगतात कमी पाऊस होणार..!  तर असो बांधवांनो नवीन हंगाम आपल्याला चांगला जाओ हि सदिच्छा.

तर शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सम्मान निधी हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्याला वर्षाला ६००० रुपये हे तीन वेगवेगळ्या टप्प्यात दिले जातात. मागील हप्ता हा आपल्याला २७ फेब्रुवारी २०२३ या महिन्यात १३ वा हप्ता मिळाला होता. आता शेतकरी PM kisan 14th Installment date 2023 ची वाट पाहत आहेत. बऱ्याच वृत्तसंस्थानी मे महिन्याच्या शेवटी PM kisan 14th Installment 2023 मिळेल असे सांगितले होते परंतु मे महिना संपून गेल्यावरही अजून हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. 

PM kisan 14th Installment date 2023 ला उशीर का ?

शेतकरी बांधवांनो या वेळी बरेच दिवस उलटूनही २००० रुपयाचा हप्ता का जमा होत नाही. तर केंद्रीय सरकार प्रधान मंत्री किसान सन्मान निधी साठीचे वेबसाईट अपडेट करत होते. त्यात काही नवीन लाभार्थ्यांच्या समावेश झाल्याने नवीन लाभार्त्यांची यादी वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच अनेकदा सांगूनही काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई- केवायसी अजून पर्यंत पूर्ण केलेली नाही त्यांना मुदत देण्यात आली होती. तुम्हीही अजून पर्यंत  ई- केवायसी केली नसेल तर मी खाली लिंक देत आहे त्यावर क्लिक करून घरच्या घरी  ई- केवायसी करू शकता.

कोणत्या तारखेला जमा होईल १४ वा हप्ता

PM kisan 14th Installment date 2023 साठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना  २७ जुलै  २०२३ महिन्यात देण्यात येईल. या बातमीची सरकार कडून आधिकारीक रित्या घोषणा झाली आहे. कृषी विभागाच्या प्रतिनिधी कडून तशी बातमी बाहेर आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त वेळ वाट पाहण्याचे कारण नाही.

पात्र असाल तरच मिळेल हप्ता 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी साठी शेतकरी पात्र असेल तरच शेतकऱ्याच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले किसान पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक केले पाहिजे. त्यात सर्व बाबींचा समावेश आहे. नवीन वेबसाईट वर त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांची एक चेकलिस्ट तयार केली आहे. ज्यात तुमचे सर्व बरोबर असेल किंवा तुम्ही पात्र असाल तर तुमच्या सर्व बाबींवर हिरवी टिकमार्क असेल. व ज्या बाबींची तुम्हाला पूर्तता करावयाची आहे अश्या बाबी लाल रंगात दाखवल्या आहेत. 

सर्वांच्या लिंक मी खाली देत आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता. व काही अडचण असल्यास तुम्ही स्वतः सोडवू शकत असाल तर सोडवा नाही तर जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या. लवकर करा वेळ खूप कमी आहे.

 Beneficiary list Direct Link:

तसेच खाली सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी देत आहे, त्यात आपले राज्य, आपला जिल्हा,आपला तालुका व आपले गाव शोधून तुम्ही ती यादी पाहू शकता. यादीत नाव आहे म्हणजे तुम्हला रक्कम मिळेलच असे नाही त्यासाठी सर्व बाबी तुम्हाला एकदा तपासून घ्याव्या लागतील, जसे कि ई- केवायसी, बँक खाते आधाराला लिंक आहे का, तुमची वैयक्तिक मोकापाहणी झाली आहे का? या सर्व बाबी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक मध्ये पाहायला मिळतील 

तर शेतकरी बांधवांनो PM kisan 14th Installment date 2023 साठी मी माहिती दिली. माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. गावच्या वॉट्सअप ग्रुप मध्ये व टेलिग्राम ग्रुप मधेही शेअर करायला विसरू नका. तुम्ही जास्त प्रमाणात शेअर केलेत तर मला अशी माहिती अजून द्यायची प्रेरणा मिळेल.

धन्यवाद. 

Beneficiary List Click Here
Beneficiary Status Click Here
Bank Seeding Check Click Here
E- KYC Click Here
Join Our Watsapp Group Click Here

No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!